चिंताजनक... 3 महिन्यांत राज्यात 610 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

चिंताजनक... 3 महिन्यांत राज्यात 610 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात 610 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सहकार व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांची विधानसभेत माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जून- यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत राज्यात 610 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती सहकार व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांची विधानसभेत माहिती आहे. यातील 192 प्रकरणे जिल्हास्तरीय समितीत पात्र ठरवण्यात आली आहेत. त्यातील 182 प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. 96 प्रकरणे निकषात बसत नसल्याने ती अपात्र ठरवण्यात आली असून 323 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे सुभाष देशमुख यांनी लेखी उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विविध सदस्यांनी लक्ष वेधले होते.

12021 शेतकऱ्यांच्या आत्महत्या...

2015-18 या काळात एकूण 12021 शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आली आहेत. यापैकी 6888 प्रकरणे निकषात असल्याने पात्र ठरवण्यात आलेली आहेत. यापैकी 6845 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन आणि सन्मान योजना राबवली. असे असतानाही गेल्या 4 वर्षांत शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही, बोंडअळी प्रादुर्भावामुळे बाधित शेतकरी वर्ग, कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे 12 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. मराठवाडय़ातील संभाजीनगर, जालना, धाराशीव, बीड, हिंगोली, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात 4 हजार 124 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी एकट्या नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 94 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर केवळ 34 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळाली. तर 8 प्रकरणे अद्यापी प्रलंबित आहेत.

नाशकात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक जिल्ह्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना 19 जून रोजी घडली.अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ जाधव (वय-50) या शेतकऱ्याने बुधवारी पहाटे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत सायखेडा (ता.निफाड) येथील शेतकरी राजेंद्र कुटे (वय-55) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

VIDEO : सिन्नर घाटात लाखमोलाची मसिर्डीज SUV जळून खाक

First published: June 21, 2019, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading