नंदुरबारमध्ये पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनसाठी गेलेले 6 तरुण बुडाले

नंदुरबारमध्ये पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनसाठी गेलेले 6 तरुण बुडाले

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली आहे.

  • Share this:

नंदुरबार, 6 सप्टेंबर: गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शहादा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. कैलास संजय चित्रकथे, सचिन सुरेश चित्रकथे, रवींद्र शंकर चित्रकथे, विशाल मंगल चित्रकथे, दीपक सुरेश चित्रकथे आणि सागर आप्पा चित्रकथे अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, शहादा जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ही दुर्घटना घडली. वडछील येथील चित्रकथे कुटुंबातील तरुणही बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले होते. यावेळी विसर्जनासाठी बाप्पाला पाण्यात घेऊन गेले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण बुडायला लागला. त्याला वाचवताना इतर पाच जणही बुडाले. या घटनेमुळे वडछील गावावर शोककळा पसरली आहे.

गणेशोत्सवाच्या धामधुमीत मंडपातच सापडला मृतदेह

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात अंदाजे 65 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

अनोळखी पुरुषाचा मृतदेह संत दामाजी मंदिरातील समोरील मंडपात बेवारस अवस्थेत होता. सुरुवातील लोकांना तो झोपला असावा असं वाटलं. पण नंतर तो मृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ऐन गणोशोत्सवात मंडपात असा मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.

मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटावी यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वंचितमधून MIM बाहेर पडण्याचं हे आहे कारण, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2019 07:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading