बुलढाण्यात 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, गोपाल कोकाटे या नराधमाला अटक !

बुलढाण्यात 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, गोपाल कोकाटे या नराधमाला अटक !

देशातील कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील अंत्रज गावातील घटनेने पुन्हा एकदा समाजमन हेलावले आहे.

  • Share this:

19 एप्रिल : देशातील कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील अंत्रज गावातील घटनेने पुन्हा एकदा समाजमन हेलावले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या अंत्रज गावात 6 वर्षीय चिमुकलीवर गावातल्याच गोपाल कोकाटे नामक नराधमाणे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी गोपाल कोकाटेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीडित मुलगी आपल्या आईबरोबर आपल्या घराबाहेर खाटेवर झोपली होती. यावेळी पीडितेची आई काही कामानिमित्त घरात गेल्याचं पाहून या नराधमाणे या 6 वर्षीय चिमुकलीला 10 रुपये देण्याचे आमिष दाखवत आपल्या घरात उचलून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.

जेव्हा या मुलीची आई घराबाहेर आली तेव्हा आपली मुलगी दिसत नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला असता ही मुलगी आरोपीच्या सोबत आढळून आली. त्यानंतर या मुलीने सर्व हकीकत आपल्या आईजवळ सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने थेट ग्रामीण पोलीस स्टेशन खामगाव गाठत आरोपी गोपाल कोकाटे विरोधात फिर्याद दाखल केली.

दरम्यान पोलिसांनी या आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला व आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास खामगाव पोलीस करत आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संताप वक्त करण्यात येत असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

First published: April 19, 2018, 8:58 AM IST

ताज्या बातम्या