रत्नागिरीत बोटीसह 6 खलाशी 10 दिवसांपासून बेपत्ता; बंदर आणि कोस्टगार्ड विभागाचं घटनेकडे दुर्लक्ष
रत्नागिरीत बोटीसह 6 खलाशी 10 दिवसांपासून बेपत्ता; बंदर आणि कोस्टगार्ड विभागाचं घटनेकडे दुर्लक्ष
26 ऑक्टोबर 2021 रोजी जयगड बंदरातील नासिर हुसेन मीया संसारे यांच्या मालकीची नाविद - 2 ही मच्छीमारी बोट 7 खलाशांसह बेपत्ता झाली आहे. या बोटीवरील 7 खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.
रत्नागिरी, 05 नोव्हेंबर: 26 ऑक्टोबर 2021 रोजी जयगड बंदरातील नासिर हुसेन मीया संसारे यांच्या मालकीची नाविद - 2 ही मच्छीमारी बोट 7 खलाशांसह बेपत्ता झाली आहे. या बोटीवरील 7 खलाशांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. मात्र अद्याप सहाजण बेपत्ता (6 sailors missing with boat) आहेत. संबंधित मच्छीमारी नौकेला जयगड बंदरात येणारी मोठी बोट धडकली होती. या अपघतात नाविद - 2 ही बोट बुडून 6 खलाशी बेपत्ता झाले आहेत. तर साखरी आगर गावातील अनिल गोविंद आंबेरकर या एकमेव खलाशाचा मृतदेह सापडला आहे.
संबंधित अपघाताच्या घटनेला दहा दिवस उलटूनही अद्याप अन्य सहा जणांचे मृतदेह सापडले नाहीत. त्यामुळे बंदर विभाग आणि कोस्टगार्ड विभागाने या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देऊन 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2021 पर्यंत जयगड बंदर, जेएसडब्ल्यू पोर्ट, कानोजी आंग्रे पोर्ट या बंदरात आलेल्या मोठ्या जहाजांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मागणी डॉक्टर नातू यांनी केली आहे. विशेष म्हणजे नाविद 2 या मच्छीमार नौकेच्या बेपत्ता होण्याच्या कालावधीत जेएसडब्ल्यूच्या परिसरात काही मृतदेह आढळल्याची चर्चा मच्छीमारांना मध्ये होती.
हेही वाचा-चंद्रपुरात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या; लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच केला हृदयद्रावक शेवट
पण या मृतदेहांबाबतची माहिती ना मच्छिमार बांधवांकडून कोस्टगार्डला दिली गेली नाही. तसेच कोस्टगार्डनेही मच्छिमारांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. जेएसडब्लू पोर्टच्या गस्ती नौकेकडूनही याची दखल घेतली नाही. संबंधित तरंगणाऱ्या मृतदेहांना किनारी आणण्याची व्यवस्था झाली असती, तर बेपत्ता झालेल्या खलाशांबाबत काही ना काहीतरी माहिती उपलब्ध झाली असती, असं मत डॉक्टर विनय नातू यांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा-17वर्षीय मुलीवर 17 जणांकडून गँगरेप; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार
संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच मृत्यू झालेल्या आणि बेपत्ता असलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी. यासोबत संबंधित घटनेला बेजबाबदार असणाऱ्या घटकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डॉक्टर विनय नातू यांनी केली आहे. या संदर्भातील लेखी पत्रही नातू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.