कोल्हापूर जिल्ह्यातील 6 मार्ग मुसळधार पावसाने बंद, 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

कोल्हापूर जिल्ह्यातील 6 मार्ग मुसळधार पावसाने बंद, 'या' पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू

जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 राज्यमार्ग व 4 प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 11 जुलै : जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 राज्यमार्ग व 4 प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. चंदगड तालुक्यातील कोल्हापूर, परिते, गारगोटी, गडहिंग्लज, कोदाळी भेडशी ते राज्य हद्द रा.मा.क्र. 189 मार्गावर कि.मी.135/200 चंदगड पुलावर 1.5 फुट पाणी आल्याने वाहतूक बंद असून रा.मा.क्र. 180 ते पाटणे फाटा मोटणवाडी फाटा प्रजिमा क्र. 76 ते रा.मा.क्र. 189 मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, घरात घुसून कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या

आजरा तालुक्यातील प्रजिमा 52 पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राम क्र. 188 ला मिळणारा प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर 2 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून इजिमा 139 सोहाळे मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

कागल तालुक्यातील सोनाळी सावर्डे बु. सावर्डे खु. केनवडे,गोरंबे, आनुर, बस्तवडे प्रजिमा क्र. 46 मार्गावर बस्तवडे बंधाऱ्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून राज्यमार्ग 195 निढोरी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. चंदगड तालुक्यातील गुडवळे, खामदळे, हेरे सावर्डे हलकर्णी प्रजिमा क्र. 71 मार्गावर करंजगाव पुलावर 1 फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून पाटणे फाटा मोटणवाडी रा.मा. 189 मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

बळीराजा दवाखान्यात, जनावरांसाठी खाकी गोठ्यात, पाहा हा VIDEO

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, नुल, येणेचवंडी, नंदनवाड प्रजिमा 86 मार्गावर निलजी बंधाऱ्यावर 6 इंच पाणी आल्याने आणि नंदनवाड गावाजवळ पाणी आल्याने वाहतूक बंद असून प्रजिमा 80 वरून दुंडगे-जरळी-मुंगळी- नुल मार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: July 11, 2020, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading