मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सांगली साधूंच्या मारहाण प्रकरणी 6 जणांना अटक, मारहाणीचे कारण आले समोर

सांगली साधूंच्या मारहाण प्रकरणी 6 जणांना अटक, मारहाणीचे कारण आले समोर

साधूंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli Miraj Kupwad, India

सांगली, 14 सप्टेंबर : सांगलीमध्ये साधूंना मारहाण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या मारहाण प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू आहे.

जत तालुक्यातल्या लवंगा या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील चार साधूंना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कर्नाटक मधून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जात असताना लवंगा या ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या साधूंना चोर समजून जमावाने हे बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

मात्र साधूंनी गैरसमजातून हा प्रकार घडल्याचा स्पष्ट करत कोणतीही तक्रार न देता पंढरपूरकडे निघून गेले होते. मात्र या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाल्यानंतर सांगली पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन उमदी पोलीस ठाण्यामध्ये साधूंच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केले आहे.

याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. आणखी संशयितांचा शोध सुरू असून केवळ गैरसमजूतीतून हा सर्व प्रकार घडल्याचं पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केलं आहे.

मागील वर्षी दरोडेखोर असल्याचं समजून साधू आणि त्यांच्या चालकांनी गावकऱ्यांनी मारहाण केली होती. यात साधूसह त्याच्या चालकाचा मृत्यू झाला होता. साधूंनी आपण नाशिकचे असून गुरुंच्या अंत्यदर्शनासाठी जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक इतकी भीषण होती की, यात एका साधूचा दुर्देवी अंत झाला होता. त्यानंतर आता शिंदे सरकारच्या काळात सांधूंना मारहाण झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

First published: