एसीबीची सगळ्यात मोठी कारवाई, भारतीय बटालियन कार्यालयात लाच घेताना 6 जणांना अटक

एसीबीची सगळ्यात मोठी कारवाई, भारतीय बटालियन कार्यालयात लाच घेताना 6 जणांना अटक

भारतीय राखीव बटालियनच्या कार्यलयावर मोठा छापा टाकण्यात आला आहे. आजपर्यंतची एसीबीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

  • Share this:

कोल्हापूर, 17 जुलै : भारतीय राखीव बटालियनच्या कार्यलयावर मोठा छापा टाकण्यात आला आहे. आजपर्यंतची एसीबीची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. एसपी ऑफिसजवळ आयआरबीच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला आहे. 40 हजाराची लाच घेताना 6 जणांना पकडण्यात आलं आहे.

एसीबीच्या या सगळ्यात मोठ्या छाप्यात १ पोलिस उपअधिक्षक, १ पोलिस निरिक्षक, २ सहाय्यक फौजदार, १ कॉस्टेबल आणि १ क्लार्क यांचा समावेश आहे. यांना 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाईचं काम सुरू आहे.

VIDEO : मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्का 'झिंगाट', तिचं नवं गाणं पाहिलंत का

त्यामुळे यात आणखी काही सुगावा लागतोय का याचा पोलीस तपास घेतायत. या कार्यालयाचा कारभार हा केंद्र सरकारकडून चालण्यात येतो. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का यावर सध्या तपास सुरू आहे. अटक केलेल्या सर्व अधिकाऱ्यांची कागदपत्र तपासण्याचं काम एसीबीकडून आता सुरू आहे. या ऐवढ्या मोठ्या कारवाईनंतरही भारतीय राखीव बटालियनकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

दरम्यान, या सगळ्यात कारवाईमध्ये केंद्र सरकार आणि परिसरातल्या स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. या कारवाईत आता कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचं नाव समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा...

कहर! फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला

गोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'

VIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन

First published: July 17, 2018, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading