मिरज-पंढरपूर मार्गावरच्या भीषण अपघातात 6 ठार,5 जखमी

मिरज-पंढरपूर मार्गावरच्या भीषण अपघातात 6 ठार,5 जखमी

सांगली जिल्ह्यात एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातले 6 जण ठार झालेत तर 5 जखमी आहेत.

  • Share this:

21 एप्रिल : सांगली जिल्ह्यात एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातले 6 जण ठार झालेत तर 5 जखमी आहेत.मिरज पंढरपूर मार्गावर मिनी बस ट्रकवर आदळल्यानं हा अपघात झाला.जखमींवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगळगाव  फाटा इथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मागच्या बाजूने मिनी बस येऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, मिनी बसच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे.

अपघातग्रस्त मिनी बसमधील सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी आहेत. पंढरपूर इथून देवदर्शन करून परतत असताना हा अपघात झाला.

अपघातातील मृतांची नावं 

विनायक मार्तंड लोंढे (वय ५०)

गौरव राजू नरदे (वय ९)

लखन राजू संकाजी (वय ३०)

 रेणुका नंदकुमार हेगडे (वय ३५)

नंदकुमार जयराम हेगडे (वय ४०)

आदित्य नंदकुमार हेगडे (वय१३ )

 

First published: April 21, 2017, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading