Home /News /maharashtra /

जन्मदात्री गेली! चार मुलींनी दिला खांदा तर एकीने दिला मुखाग्नी, गावकऱ्यांचेही डोळे पाणावले

जन्मदात्री गेली! चार मुलींनी दिला खांदा तर एकीने दिला मुखाग्नी, गावकऱ्यांचेही डोळे पाणावले

Beed News: बीडमधील काही भगिनींनी या रुढी परंपरेला फाटा दिला आहे. त्यांनी रुढी परंपरांना फाटा देत आपल्या जन्मदात्या आईच्या प्रेताला खांदा दिला आहे. एवढंच नाही तर, मुखाग्नीही मुलीनेचं दिला आहे.

बीड, 21 मे: घरातील आई किंवा वडिलांचा निधन झालं तर, वंशाचा दिवा अर्थात घरातील मुलगा त्यांच्या चीतेला मुखाग्नी देतो. पण बीडमधील काही भगिनींनी या रुढी परंपरेला फाटा दिला आहे. त्यांनी रुढी परंपरांना फाटा देत आपल्या जन्मदात्या आईच्या प्रेताला खांदा दिला आहे. एवढंच नाही तर, मुखाग्नीही मुलीनेचं दिला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम पाळून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पडला आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर कासारजवळील जांब येथील रहिवासी असणाऱ्या लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे यांचं काल पहाटे वृद्धापकाळानं  निधन झालं. अशात लक्ष्मीबाई यांना एकूण सहा मुली आहेत. घरात कोणीही मुलगा नसल्यानं त्यांच्या प्रेताला खांदा कोण देणार? मुखाग्नी कोण देणार? अशी चर्चा नातेवाईकांत सुरू झाली होती. यावेळी लक्ष्मीबाई यांची सर्वात लहान मुलगी समोर आली आणि मी मुखाग्नी देते असं सांगितलं. तर अन्य 4 मुलींनी आईच्या प्रेताला खांदा देण्याचं ठरवलं. तर अन्य एका मुलीनं अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली. हे वाचा-‘कोरोना काळात करा असं लग्न’;अगदी साधेपणानं लग्नगाठ बांधत आमदारानं दिला खास संदेश यानंतर मृत लक्ष्मीबाई यांना सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या 4 मुलींनी खांदा दिला. तर कचराबाई खंडागळे या मुलीनं अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली. तर अंत्ययात्रेत पाणी, ताट घेऊन स्मशानभूमीकडे घेऊन जाण्याच काम सर्वात लहान मुलगी शंकुतला सुतार यांनी पार पाडली. गावातील स्माशानभूमीत नातेवाईकांच्या उपस्थितीत लक्ष्मीबाई यांच्या प्रेताला अग्नी दिला गेला. या अनोख्या अंत्यसंस्कारानं गावातील आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे डोळे आपसूकचं पाणावले होते. हे ही वाचा-कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात बलात्काराचा प्रयत्न, मृत्यूनंतर मुलीनं केला आरोप संपत्ती, पैसा, घर, शेती यांचा उत्तराधिकारी पुरुष असतो, हा समज मोडीत काढत या सहा बहिणींनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मुलगा नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही, पाणी कोण पाजणार, स्वर्गाच द्वार उघणार का? मुलानं मुखाग्नी दिला तरच या गोष्टी पूर्ण होतात, असा गैरसमज अजूनही ग्रामीण भागात पाहायला मिळतो. पण परंपरेला छेद देत या सहा बहिणींनी आईवर  अंत्यसंस्कार केले आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Beed news, Death, Funeral, Mother

पुढील बातम्या