मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

55 लाखांचं बक्षीस, स्पेनचा दौरा! गोविंदाना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून खिरापतीचे थर

55 लाखांचं बक्षीस, स्पेनचा दौरा! गोविंदाना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून खिरापतीचे थर

Dahi Handi: राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदाना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बक्षिसांची खैरात केली आहे.

Dahi Handi: राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदाना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बक्षिसांची खैरात केली आहे.

Dahi Handi: राज्यात दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदाना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बक्षिसांची खैरात केली आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट :  कोरोनामुळे दोन वर्षांच्या शांततेनंतर यंदा 'दहीहंडी' (Dahi Handi ) उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी गुरुवारी (18 ऑगस्ट 2022) विधानसभेत केली.  दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमातील तरुण सहभागींना म्हणजेच गोविंदाना स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत (sports quota) सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल. दहीहंडी पथकातील गोविंदाना आपल्याकडे ओढण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. या पक्षांकडूनही दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. या पक्षांतर्फे गोविंदांना  1.11 लाख ते 55 लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं जाहीर करण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वीपेक्षा ही रक्कम जास्त आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) यंदा एकूण 55 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सांगितले की, पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विजेत्याला 11 लाख रुपये दिले जातील. जो संघ विश्वविक्रमाशी बरोबरी करेल किंवा तो मोडेल, त्याला स्पेनला (Spain) जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील इस्कॉन मंदिरात कसा साजरा होतो जन्माष्टमी महोत्सव, पाहा VIDEO भाजपनं (BJP) शिवसेनेच्या (Shiv Sena) बालेकिल्ल्यांमध्ये स्वत:ला बळकट करण्यासाठी मुंबईत 300 हून अधिक दहीहंडीचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानावर सर्वांत मोठा कार्यक्रम होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किमान 3 आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपच्या या खेळीकडे एक प्रकारे सत्तापालट म्हणून पाहिलं जातंय. मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आशीष शेलार यांनी या कार्यक्रमात स्वतः लक्ष घातलंय. दरम्यान, शिवसेनेनं सेना भवन या मुख्यालयासमोर ‘निष्ठा दहीहंडी’चं आयोजन केलं आहे. आदित्य ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी कार्यक्रमाला भेट देणार आहेत या निष्ठा दहीहांडीसाठी स्वामी प्रतिष्ठानने एकूण 51 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली असून विजेत्याला 11 लाख रुपये मिळणार आहेत. Nashik : 197 वर्ष जुन्या मुरलीधर मंदिरात जन्माष्टमीची धूम, पाहा VIDEO संस्कृती युवा प्रतिष्ठानने प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या संघाला 21 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अनेक ठिकाणी राजकीय दहीहंडीला भेट देणार आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांच्या नावाने दोन दडीहंडी असतील, अशी घोषणा केली आहे. तसंच प्रत्येकी 11 लाख रुपयांचे पहिलं बक्षीस असेल असंही त्यांनी सांगितलंय. “ही दहीहंडी निष्ठा, एकता, संस्कृती आणि हिंदुत्वाचा आवाज आहे. या हंडीला आनंद दिघे यांचा आशीर्वाद आहे आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केला आहे,” असं त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं की, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमातील विजेत्यांना ठाणे आणि मुंबईतील दोन हंडीसाठी प्रत्येकी 2.15 लाख रुपये मिळतील. भाजपचे राम कदम हे भगवान कृष्णाच्या वेशातील 75 लहान मुलांसह आणि भारत मातेची वेषभूषा केलेल्या 75 लहान मुलांसह दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणार आहेत.
First published:

Tags: Maharashtra politics

पुढील बातम्या