मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mucormycosis राज्यात ब्लॅक फंगसचे 52 मृत्यू, एक लाख इंजेक्शनसाठी सरकार जारी करणार टेंडर

Mucormycosis राज्यात ब्लॅक फंगसचे 52 मृत्यू, एक लाख इंजेक्शनसाठी सरकार जारी करणार टेंडर

Black Fungus in Maharashtra: राज्य सरकार म्युकरमाइकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक लाख एम्फोटेरिसिन-बी अँटी फंगल इंजेक्शनच्या खरेदीसाठी टेंडर काढणार आहे. डोळे आणि नाकावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या करणाऱ्या म्युकरमाइकोसिस (Mucormycosis)आजाराचा मृत्यूदर खूप जास्त आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 15 मे : महाराष्ट्रात (Maharashtra) म्युकरमाइकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस (Black Fungus)मुळे आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. अत्यंत दुर्मिळ अशा या फंगल इन्फेक्शन (Fungal Infection)मुळे मृत्यू झालेल्या सर्वांना आधी कोरोनाची लागण झाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता राज्य सरकारही सक्रिय झाले आहे. राज्य सरकार एक यादी तयार करत असून त्यात ब्लॅक फंगस (Black Fungus)मुळं झालेल्या मृत्यूसंबंधी माहिती उपलब्ध असेल.

(वाचा-कोरोनावर मात केली तरी तुमचं आरोग्य धोक्यात; या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका)

पीटीआय या वृत्तसंस्थेला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, महाराष्ट्रात गेल्या वर्षी कोविड-19 चा प्रकोप सुरू झाल्यापासून आतापर्यंत 52 जणांचा म्युकरमाइकोसिसने मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ब्लॅक फंगसचे 1500 रुग्ण होते अशी माहिती दिली होती. आता या नव्या संकटामुळं आधीच कोरोनाचं संकट असलेल्या राज्य सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त तणाव निर्माण झाल्याचंही टोपे म्हणाले होते.

राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, राज्य सरकार म्युकरमाइकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी एक लाख अॅम्फोटेरिसिन-बी अँटि फंगल इंजेक्शन खरेदी करण्यासाठी टेंडर काढणार आहे. डोळे आणि नाकावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या म्युकरमाइकोसिसचा मृत्यूदर अत्यंत जास्त आहे. त्यामुळं आधीच कोरोनाच्या विरोधात युद्ध सुरू असलेल्या आरोग्य विभागासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

(वाचा-बनावट रेमडेसिवीर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मात्र इंजेक्शन घेतलेले 90% रुग्ण बरे)

अधिकाऱ्याने सांगितले की, म्युकरमाइकोसिस इतर आजारांप्रमाणे नोटिफाइड नाही. त्यामुळं याच्याशी संबंधित प्रकरणांची माहिती किंवा डेटाबेस तयार करण्यात आलेला नाही. आता कोविड 19 च्या प्रकरणांबरोबरच ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळं राज्यामध्ये आता याबाबत माहिती जमा करायला सुरुवात केली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, म्युकरमाइकोसिस अशा कोरोना रुग्णांमध्ये आढळत आहे, ज्यांना डायबिटीज, साखरेचे प्रमाण कमी जास्त होणे किंवा रक्तात लोहाचे प्रमाण वाढलेले असेल.

कमकुवत रोगप्रतिकार क्षमता किंवा एखाद्या गंभीर आजाराचा सामना करत असलेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक आहे. त्यामुळं राज्य सरकारने म्युकरमाइकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता राज्य सरकार कोरोनाबरोबरच या नव्या आजाराशी दोन हात करण्यामध्ये अधिक व्यस्त होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra News