मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हिंगोली: 5 वर्षात केल्या 5 हजार प्रसूती; पण स्वत:च्या प्रसूतीदरम्यान नर्सचा दुर्दैवी शेवट

हिंगोली: 5 वर्षात केल्या 5 हजार प्रसूती; पण स्वत:च्या प्रसूतीदरम्यान नर्सचा दुर्दैवी शेवट

(फोटो-दिव्य मराठी)

(फोटो-दिव्य मराठी)

Hingoli News: हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात 5 वर्षात सुमारे 5000 प्रसूती करणाऱ्या अधिपरिचारिकेचा स्वत:च्याच प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे.

    हिंगोली, 15 नोव्हेंबर: हिंगोली (Hingoli) येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिपरिचारिकेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू (nurse died while giving birth of child) झाला आहे. संबंधित अधिपरिचारिका गेल्या पाच वर्षांपासून याठिकाणी शासकीय रुग्णालयात काम करत होत्या. गत पाच वर्षांच्या काळात त्यांनी एकूण 5 हजार प्रसूती यशस्वीपणे केल्या आहेत. पण स्वत:च्याच प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रसूतीदरम्यान शारीरिक गुंतागुंत झाल्यानं त्यांचा दुर्दैवी शेवट झाला आहे. या घटनेनं रुग्णालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्योती गवळी असं मृत पावलेल्या 38 वर्षीय अधिपरिचारिकेचं नाव आहे. त्या हिंगोलीतील शासकीय रुग्णालयातील प्रसूती कक्षात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्यांनी गोरेगाव याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम केलं आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात ज्योती यांनी सुमारे पाच हजार प्रसूती केल्या आहेत. सिझेरियन प्रसूतीमध्ये त्यांचा सहभाग असायचा. गरोदर महिलांशी आपुलकीनं वागणे, त्यांना प्रसूतीदरम्यान धीर देणे, अशाप्रकारच्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी रुग्णालयातील प्रत्येकाला आपलंस केलं होतं. हेही वाचा-लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा 8 वर्षीय ज्योती यांना 8 नोव्हेंबर रोजी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. याठिकाणी त्यांची सिझेरियन पद्धतीनं प्रसूती करण्यात आली. त्यांना मुलगा झाला. मुलाची प्रकृती ठणठणीत होती. पण मुलाला जन्म दिल्यानंतर ज्योती यांची प्रकृती अचानक खालावली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. पण याठिकाणी उपचार घेत असताना, त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. हेही वाचा-जादूटोणा झाल्याचं सांगत तरुणीला बोलावलं घरी; नराधमाने गुंगीचं औषध पाजलं अन्... त्यांना श्वास घ्यायला त्रास होतं होता. त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला. पण एकंदरित त्यांची परिस्थिती पाहता, औरंगाबादला हलवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं. याठिकाणी उपचार घेत असताना, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतं होती. पण रविवारी पहाटे अचानक श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचं बाळ सुखरुप असून त्याला नातेवाकांकडे देण्यात आलं आहे. ज्योती यांचा अशाप्रकारे निधन झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death

    पुढील बातम्या