• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 500 कोटींचे बिटक्वाईन, मोबाईलमध्ये डेटा अन् माधवची गोळ्या झाडून हत्या, वाशिममधील थरारक घटना

500 कोटींचे बिटक्वाईन, मोबाईलमध्ये डेटा अन् माधवची गोळ्या झाडून हत्या, वाशिममधील थरारक घटना

निशीद वासनिकवर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निशीद वासनिकवर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निशीद वासनिकवर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 • Share this:
  किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 17 सप्टेंबर : झटपट श्रीमंतीचा मार्ग दाखवणाऱ्या  बिटक्वाइनची (bitcoin) जादू आता सर्वदूर पसरत चालली आहे. अनेक जण रातोरात बिटक्वाइनमुळे कोट्यवधीश होत आहे. पण, बिटक्वॉइनचा हा व्यवहार वाशिममध्ये (washim) एका तरुणाचा जीवावर बेतला आहे.  बिटकॉइनच्या कोट्यवधीच्या व्यवहारावरून या तरुणाची अपहरण करून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला ही घटना घडली होती. त्यानंतर वाशिम पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटविल्यानंतर तो नागपूरचा असल्याचं निष्पन्न झाले. माधव पवार (madhav pawar) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.  त्यानंतर वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवीत नागपूर येथील शुभम कान्हारकर, विकल्प मोहोड, व्यंकटेश भगत या तिघांना अटक केली आहे. सदर हत्याकांड आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे दिसून येत आहे. काय आहे प्रकरण? 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान, मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पांगरी कुटे गावात एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर गोळीबाराचे निशाण दिसून येत होते. दोन गोळ्या या डोक्यामध्ये मारण्यात आल्या होत्या. तर एक गोळी छातीत मारली होती. संपूर्ण शरीर हे नग्न अवस्थेत होतं. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी राज्यभरातील पोलीस स्टेशनला माहिती पोहोचवण्यात आली. त्यानंतर नागपूर येथून माधव पवार या व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत! त्यानंतर तपास केला असता बिटकॉइनच्या व्यवहारातून ही हत्या झाली असल्याचं समोर आलं. निशीद वासनिक आणि त्याच्या साथीदाराने माधवचा खून केला. 11 तारखेला त्याचं नागपुरातून अपहरण करून मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे शेतशिवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माधव पवार आणि मुख्य आरोपी निशीद वासनिक यांचामध्ये नागपूर येथे बिटकॉईन चा व्यवसाय होता. यामध्ये निशीद वासनिकवर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कॉलगर्ल, अपहरण आणि हत्या निशीदवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कुटुंबासह फरार झाला. पण ,माधव हा नागपुरातच थांबला होता. बिटक्वाईनच्या धंद्यातून त्यांनी कोट्यवधीचा व्यवहार केला होता. हा संपूर्ण व्यवहार मोबाईलमध्ये होता आणि हा मोबाईल माधवकडे होता. त्यामुळे निशीदने त्यांच्याकडे फोन मागितला. पण, त्याने देण्यास टाळाटाळ केली. 18 ऑगस्टपासून तो माधवकडे मोबाईल मागत होते. पण, तो देत नसल्यामुळे त्याने काटा काढण्याचं ठरवलं. निशीद याने नागपूरमध्ये अंजली नावाच्या एक कॉलगर्लला सोबत घेतले. तिने माधवला फोन केला आणि व्हिडीओ चॅट करून त्याला फॉर्महाऊसवर बोलावले. माधव तिला भेटण्यासाठी निघाला असता निशीद याने माधव याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने मोबाईलची विचारणा केली. पण, तरीही त्याने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे वाशिममध्ये त्याला घेऊन आले आणि रस्त्याच्या बाजूला थांबून गोळ्या झाडून त्याचा खून केला. पर्यटनामुळे दाम्पत्य झाले कोट्यवधी; समुद्रावर मज्जा-मस्ती करताना आयुष्य बदललं मृतक माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये बिटक्वाईनसह इतर सर्व व्यवहाराची माहिती होती. त्यामुळे या व्यवहारासाठी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.या खून प्रकरणी तीन पुरुष आरोपींना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान, लवकरच त्यांना ही अटक करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. बिटक्वाईन च्या व्यवहारावरून गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. बिटक्वाईनच्या आर्थिक व्यवहारावरून माधव पवार याला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी यातील तीन आरोपींना जरी अटक केली असली तरी मुख्य आरोपी आणि इतर दोघे अद्याप फरार आहेत. त्याचा ही शोध घेतल्यास बिटकॉइन व्यवहाराचे खरे वास्तव समोर येईल. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करत आहेत.
  Published by:sachin Salve
  First published: