मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार नाराज, भाजप नेत्यांचा गंभीर आरोप

महाविकास आघाडीचे 50 ते 60 आमदार नाराज, भाजप नेत्यांचा गंभीर आरोप

'राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ?

'राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ?

'राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ?

शिर्डी, 28 डिसेंबर :  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीवरून (Maharashtra Assembly Speaker Election) महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल (Governor vs MVA Government) यांच्यात संघर्ष पेटला आहे. या वादात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नाही. पण,  राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ? असा सवाल भाजपचे (bjp) आमदार चंद्रशेखर बावनकुळे ( chandrashekhar bawankule) यांनी उपस्थित केला. तसंच, जवळपास 50 ते 60 सत्ताधारी आमदार सरकारवर नाराज असुन 16 महिने मुख्यमंत्री भेटत नसतील त्यांची कामे होत नसतील तर काय होणार, असंही बावनकुळे म्हणाले.

विधान परिषदेत निवडून गेल्यानंतर भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी साई दरबारी हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

'राज्य सरकारला कायदा आणण्याची गरज का? आणि गुप्त मतदानाचा कायदा असताना या सरकारला आपल्या आमदारांवर विश्वास का नाही ? मुळात विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपाल चुकीचं पत्र सरकारला देणार नाही. या सरकारमध्ये खरच धमक असेल तर गुप्त मतदान घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असं आवाहन बावनकुळे यांनी सरकारला केलं.

(इंग्लिश गाण्यावर डान्स करताना Sapna Chaudhary चा Video Viral, चाहते म्हणाले..)

राज्याच्या उर्जामंत्र्यांना प्रशिक्षणाची गरज असून त्यांना वाटत असेल तर मी काही दिवस द्यायला तयार आहे, असा मिश्कील टोला बावनकुळे यांनी उर्जामंत्री नितीन राऊतांना लगावला.

'फडणवीस सरकारने 28 हजार कोटींची वीज दिली, एकही कनेक्शन कापल गेलं नाही. भाजप सरकार जाताना तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या. पुन्हा भाजप सरकार आले तर पाच वर्षे वीज न कापता शेतकऱ्यांना अखंडीत देऊ असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

(NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे Vacancy; लगेच करा अर्ज)

'सर्वोच्च न्यायालयाचे दोन वर्षात दोनदा आदेश आलेत. दोन वर्षे यांनी टाईमपास केला. काही लोकांना या जागा बळकावून धनदांडग्यांना देण्याची तयारी केली. आधीच इंपेरिकल डेटा तयार करण्यासाठी निधी का दिला नाही‌' असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

First published: