नवी मुंबई, 10 डिसेंबर : नवी मुंबईतील (navi mumbai nri complex) एनआरआय या उच्चभ्रू वसाहतीमध्ये सोसायटीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. सोसायटीच्या (society rules) आवारात भटक्या कुत्र्यांना लगाम घालण्यासाठी तब्बल 5 हजार ते 50 हजरांपर्यंत दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे श्वानप्रेमी संतापाची लाट पसरली आहे.
त्याचं झालं असं की, सीवूड इस्टेट लिमिटेड हे गृह संकुल सुमारे 47 एकरच्या विस्तीर्ण जागेवर उभी आहे. या परिसरात मोकाट श्वानांचा वावर आहे. या मोकाट श्वानांना आळा घालण्यासाठी येथील रहिवाशांमध्ये दोन गट पडले असून एक गट भूतदया दाखवत श्वानांना जेवू खाऊ घालतो तर दुसरा गट मात्र यांच्याविरोधात असून मोकाट श्वान नकोच असं सांगत आहे. कोरोना काळात हा विषय जास्त चिघळला त्यातूनच संकुलातील पदाधिकाऱ्यांनी जो कोणी उघड्यावर मोकाट श्वानांना खाऊ घालेल त्याला 5 हजाराचा दंड ठोठावणे सुरू केले. अनेकांचे असे दंड लाखांपर्यंत पोहचल्याचे काही रहिवाश्यांनी सांगितले.
Shocking! उंदीर चावल्याने महिलेला झाला कोरोना; Omicron च्या संकटात खळबळजनक बातमी
सोसायटी एवढ्यावरच थांबली नाही तर ज्या श्वानाला जेवू घातले आणि त्याने जर रात्रीच्या वेळेस भुंकले तर जेवू घालणाऱ्या रहिवाश्यांवर 5 हजाराचा दंड ठोठावण्यात येत आहे. जर त्या श्वानाने घाण केली तर 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. जर श्वान अंगावर धावून गेला तर २५ हजार रुपये दंड आणि जर त्याने कोणास चावला तर जेवू घालणाऱ्या नागरिकाला 50हजारांचा दंड ठोठावण्यात येत आहे. यामुळे श्वान प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे या पूर्ण परिसरात ३८ मोकाट श्वान आहेत. दोन तीन महिन्यापासून यातील तीन श्वानांचा मृत्यू झाला. त्यामुळे श्वान प्रेमी आक्रमक झाले आहेत.
गणपती उत्सवात याच ठिकाणी राहत असलेले टिंगू नावाच्या श्वान खूप प्रसिद्ध झाला होता. एक भाविक गणपती मूर्ती विसर्जनाला घेऊन जात असताना त्याला अडवून पुढील दोन्ही पायांनी गणपतीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा फोटो हा याच परिसरातला व्हायरल झाला होता.
48 वर्षांच्या Malaika Arora ने केलं असं Bold फोटोशूट, की...'तेव्हापासून हे श्वान सर्वांचे लाडके झाले होते. त्या श्वानांची नोंद मनपात असल्याने त्याच्या गळ्यात पट्टा ही होता. हाच टिंगू दोन तीन दिवसापासून बेपत्ता होता त्याचा शोध अनेकांनी घेतला मात्र तो सापडला नाही. बुधवारी त्याचे शव याच परिसरात आडोशाला आढळून आले. मात्र येथील पंप हाऊस परिसरात त्याच्या गळ्यातील पट्टा आणि नायलॉनची दोरी आढळून आल्याने त्याची हत्या केली असावी असा संशय श्वान प्रेमींनी व्यक्त केला आणि पोलिसांत तक्रार दिली आहे.
आता सोसायटीने केलेल्या या नियमांविरोधात श्वान प्रेमी कमालीचे नाराज आहे. पण, संकुलात मागच्या काही महिन्यापासून 15 पेक्षा अधिक श्वानाने चावण्याचे प्रकार घडले असून त्यात शालेय विद्यार्थी ते 80 वर्षीय जेष्ठ महिलांचा समावेश आहे, त्यामुळे असे नियम करावे, लागले असं सोसायटीचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.