मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलढाणा शहरात 50 डुकरांचा मृत्यू, स्वाईन फ्लूची भीती, नागरिकांमध्ये धाकधूक

बुलढाणा शहरात 50 डुकरांचा मृत्यू, स्वाईन फ्लूची भीती, नागरिकांमध्ये धाकधूक

बुलढाणा शहरात 50 डुकरांचा मृत्यू

बुलढाणा शहरात 50 डुकरांचा मृत्यू

बुलढाणा शहरात स्वाईन फ्लूचा आजाराचा धोका निर्माण झाला असून या आजाराला जोडूनच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Chetan Patil

राहुल खंदारे, बुलढाणा, 25 ऑगस्ट : बुलढाणा शहरात स्वाईन फ्लूचा आजाराचा धोका निर्माण झाला असून या आजाराला जोडूनच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बुलढाणा शहरातील सर्कुलर रोडवरील प्रभाग क्र 13 व 14 मध्ये पंधरा दिवसात जवळपास 40 ते 50 डुकरांचा मृत्यू झाला आहे. स्वाईन फ्लू हा आजार डुकरांशी संबधीत असल्याने भाजपचे माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान नगर परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आलेलं आहे. मरण पावलेल्या डुकरांचा योग्य विल्हेवाट लावून शहरात पावडर आणि धुराची फवारणी करत आहोत. मोकाट फिरत असलेल्या डुकरांचा त्यांच्या मालकांनी तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा नगर परिषद प्रशासनाकडून नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिला आहे.

(अजित दादा रोखठोक, जयंत पाटील गोड बोलून... : एकनाथ शिंदे)

मागील आठवड्यात येथील इकबाल चौकातील एक युवक स्वाईन फ्लूचा बळी ठरला आहे. नंतर एक 28 वर्षीय तरुणी स्वाईन फ्लूबाधित आढळली होती. तर बुधवारी सरस्वती नगरमधील 60 वर्षीय वृद्धास स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आले आहे. या वृद्धाला आठ दिवसांपूर्वी ताप आणि खोकला होता. त्याला शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

संबंधित डॉक्टरला संशय आल्यानंतर त्यांनी वृद्धाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून रुग्णाला स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती संबधित डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेऊन अॅक्शन मोडवर आले आहे.

First published:

Tags: Buldhana news, Crime news