मुक्ताईनगर, 30 नोव्हेंबर : 'संजय राऊत एक घाण असून याच घाणीचा साम्राज्यामुळे 50 लोक गेली' असं म्हणत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
'सीमा वादाचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीला नवस करणार का असा टोला खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह यांच्या आमदारांना लगावला आहे. यावरून शिंदे गटातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे कामानिमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
(उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे...; संजय राऊतांचा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल)
'नुसतचं तोंड चालून काही होत नाही, कधी कुणाला चांगलं म्हणायचं कधी कुणाला वाईट म्हणायचं , रेडे म्हणायचं.. घाण करणारा जमिनीवरचा प्राणी कोण आहे. तुम्ही जी घाण केली. या घाणीमुळे घाणीच्या साम्राज्यामुळे 50 लोक तिकडे गेले. नावाने बोलताना मला वाईट वाटतंय मात्र जमिनीवरचा घाणीच साम्राज्य करणारा जो प्राणी असेल ते म्हणजे संजय राऊत आहेट अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
'माझ्यावर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. त्यालाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे दररोज बोलायचं दररोज काहीतरी प्रसिद्ध मिळवायची असं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासारखा ते स्वतः आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्व समजतात का? असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.
('राज्यपाल त्या दिवशी चुकले, पण...', बावनकुळे अखेर स्पष्टच बोलले)
'सीमा वादाचा प्रश्न सोडवण्याची ताकद आमच्या हातात आहे. त्यासाठी युतीचे सरकार सक्षम आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आम्ही देवीच्या आशीर्वाद घेतोच त्यामुळे विशिष्ट कामासाठी आशीर्वाद घेतले पाहिजे असं काही नाही. भाजप शिंदे गटाच्या युतीच्या सरकारच्या माध्यमातून कर्नाटकातील मराठी बांधवांना निश्चितच न्याय मिळेल. असेही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news