Home /News /maharashtra /

50 लाख द्या नाहीतर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर RDX लावून उडवून देईन, बीडमध्ये खळबळ

50 लाख द्या नाहीतर परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर RDX लावून उडवून देईन, बीडमध्ये खळबळ

. मंदिर समिती आणि विश्वस्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. मंदिराला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

. मंदिर समिती आणि विश्वस्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. मंदिराला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मंदिर समितीकडे एका गुंडाने 50 लाख रुपयाची (50 lakh threatened letter) खंडणी मागितली आहे.

परळी, 26 नोव्हेंबर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेलं बीड (beed) जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर (Parli Vaidyanath Jyotirlinga temple) आरडीएक्स (rdx) लावून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिर समितीकडे एका गुंडाने 50 लाख रुपयाची (50 lakh threatened letter) खंडणी मागितली आहे. या पत्रामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं आहे. ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर डी.एक्सने मंदिर उडवून देवू असा मजकूर लिहलेला आहे. त्यावर मोबाईल नंबर व नाव आहे. रतनसिंग रामसिंग दख्खणे अशी धमकी देणाऱ्या गुंडाचे नाव आहे. पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय; 10 वर्षांपासून सुरू होतं कृत्य 'मी फार मोठा नामी गुंड आहे व ड्रग माफिया असून गावठी पिस्तूल धारक आहे.  मला माझ्या तातडीची गरज भागवण्यासाठी आपल्या मंदिर संस्थांकडून 50 लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच आपण मला वरील रक्कम माझ्या खालील पत्त्यावर ताबडतोब पोस्ट करावी, नसता  आपले मंदिर संस्थान माझ्याकडील आरडीएक्स उडवून लावेल, अशी धमकीच या गुंडाने दिली आहे.  तसंच, ही धमकी समजण्याची घोडचुक करू नये ही विनंती, असंही हा गुंड पत्रात म्हणत आहे. आई सोडून गेली पण 10 महिन्याचे बाळ दूध पिण्यासाठी धडपडत होतं, अमरावतीतील घटना या पत्रानंतर एकच खळबळ उडाली आहे. मंदिर समिती आणि विश्वस्त यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिले आहे. मंदिराला अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या