Home /News /maharashtra /

दगडाने दुधाचे दात पाडल्यास शाळेत घ्याल का? चिमुकल्याचे प्रश्न ऐकून खळखळून हसाल, पाहा VIDEO

दगडाने दुधाचे दात पाडल्यास शाळेत घ्याल का? चिमुकल्याचे प्रश्न ऐकून खळखळून हसाल, पाहा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाच वर्षांचा एक चिमुकला शाळेत अ‍ॅडमिशन मिळावं म्हणून शिक्षिकेला विनवणी करताना दिसत आहे.

    नंदुरबार, 19 डिसेंबर: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना  विषाणूनं थैमान (corona pandemic) घातलं आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण अलीकडेच राज्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा घंटा वाजली (School reopen) आहे. प्रदीर्घ सुट्टीनंतर लहान मुलं पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागली आहेत. पण कोरोनाच्या भीतीने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला धजावत आहेत. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये पाच वर्षांचा एक चिमुकला शाळेत अ‍ॅडमिशन मिळावं म्हणून शिक्षिकेला विनवणी (requesting to teacher for school admission) करताना दिसत आहे. यावेळी संबंधित शिक्षिका त्याला शाळेत अ‍ॅडमिशन का दिलं जात नाहीये, हे त्याला कळेल अशा भाषेतून समजावून सांगत आहे. यावेळी शिक्षिकेनं म्हटलं की, 'तुझे दुधाचे दात ज्यावेळी पडतील, त्यावेळी तुला शाळेत अ‍ॅडमिशन मिळेल'. शाळेतील बाईंचं हे स्पष्टकरण ऐकूण चिमुकल्याने विचारलं की, 'बाई, दगडाने दुधाचे दात पाडले तर मला अ‍ॅडमिशन मिळेल का?' हेही वाचा-OMG..! महाराष्ट्रात एकच चर्चा, 'या' म्हशीला पाहण्यासाठी जमतेय लाखोंची गर्दी चिमुकल्याचा हा प्रश्न ऐकून शाळेतील शिक्षिकाही हैराण झाल्या आहेत. त्यांनी अगदी प्रेमाने तसं न करण्याचा सल्ला चिमुकल्याला दिला आहे. चिमुकल्याच्या निरागस मागणीपुढे शेवटी शिक्षिका देखील बळी पडल्या आहेत. त्यांनी चिमुकल्याला शाळेत बसण्यास परवानगी दिली आहे. पण वय पूर्ण झाल्यानंतर, तुला शाळेत नाव नोंदवू असंही संबंधित शिक्षिका चिमुकल्याला समजावून सांगताना दिसत आहेत. एकीकडे शाळेत जायला नको म्हणून भोंगा पसरणारी लेकरं असताना, हा चिमुकला मात्र शाळेत प्रवेश घेण्यासाठी शिक्षिकेला विनवणी करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार, संबंधित व्हिडीओ हा नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील ससदे टेकडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आहे. पण या घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या