Home /News /maharashtra /

चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेलेल्या 5 वर्षांच्या मुलाला भरधाव पिकअपने चिरडले, भंडाऱ्यातील घटना

चॉकलेट घेण्यासाठी दुकानात गेलेल्या 5 वर्षांच्या मुलाला भरधाव पिकअपने चिरडले, भंडाऱ्यातील घटना

धडक बसल्यामुळे यश शेंडे गाडीच्या मागच्या चाकात दबला गेलाा आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

धडक बसल्यामुळे यश शेंडे गाडीच्या मागच्या चाकात दबला गेलाा आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

धडक बसल्यामुळे यश शेंडे गाडीच्या मागच्या चाकात दबला गेलाा आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 28 मे : चॉकलेट (Chocolate) आणण्यासाठी दुकानात गेला असता 5 वर्षांच्या चिमुरड्याला भरधाव वाहनाने चिरडल्याची मन हेलावून टाकणारी घटना भंडारा (bhandara) जिल्ह्यातील तुमसरमध्ये घडली आहे. हा चिमुरडा भरधाव वाहनांच्या मागच्या चाकात आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील लंजेरा गावात ही घटना घडली. 5 वर्षीय यश योगीराज शेंडे (राहणार लंजेरा) असे मृतकाचे नाव आहे. तुमसरमध्ये सध्या तेंदूपत्ता संकलन करुण त्यांची वाहतूक केली जात आहे. तुमसर तालुक्यात जंगल भाग असल्याने मोठया प्रमाणात तेंदूपत्ता तोडायचे काम सुरू आहे. तर आज  पिटेसुर गावावरून तेंदुपत्ता घेऊन पीकअप गाडी लंजेरा मार्ग पुढे जात होती. तर लंजेरा गावातील यश शेंडे हा आपल्या लहान सायकलने दुकानात जात होता. किराणा दुकानातून तो छोट्या सायकलने चॉकलेट आणण्यासाठी चालला होता. (जान्हवी कपूरचा डार्क पिंक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, हे लेटेस्ट PHOTOS पाहिले का?) त्याचवेळी पिकअप गाडीने यशच्या दुचाकीला धडक दिली. धडक बसल्यामुळे यश शेंडे गाडीच्या मागच्या चाकात दबला गेलाा आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गावात पसरली असताना गावकरी मोठ्या संखेने जमा होताच चालक घटनास्थळावर गाडी सोडून पसार झाला. संतप्त गावकऱ्यांनी गाडीची जोरदार तोडफोड केली.   लहानशा चिमुकल्याचा मृत्युमुळे गावात  शोककळा पसरली आहे.  या घटनेची  माहिती आंधळगाव पोलिसांना देण्यात आली असुन पुढील तपास करित आहे. (सोसायटीत पार्किंगचा वाद, गावगुंडांनी हॉकी स्टिकने केली मारहाण, घटनेचा LIVE VIDEO) आणण्यासाठी जात असलेल्या 5 वर्षीय बालकाला तेंदूपत्ता भरलेल्या वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. वाहनांच्या मागच्या चाकात आल्याने बालकांचा जागीच मृत्यू झाला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या