शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखावर 5 ते 6 जणांचा हल्ला, गोळीबारात मृत्यू

घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

  • Share this:
कोपरगाव, 15 मार्च : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे पाटील यांची 5 ते 6 जणांच्या टोळीने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोपरगाव तालुक्याचे शिवसेना उपप्रमुख सुरेश गिरे यांच्यावर भोजडे गावात हल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सुरेश गिरे आपल्या भोजडे गावातील घरी असताना संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान मोटरसायकल आणि कारमधून आलेल्या हल्लेखोरानी गिरेंना बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्रानेही वार केले. हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही, या टोळीतील एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने सुरेश गिरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. सुरेश गिरे यांची हत्या कोणत्या कारणाहून झाली हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना झाली आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.   कोयता गँगने मुलाला बेदम मारहाण करून तोंडावर केलं मूत्रविसर्जन दरम्यान, मुळशी पॅटर्न सिनेमालाही लाजवेल असा प्रसंग पुण्यात घडला आहे. कोयता गँगने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केलं आणि नग्न करून कोयत्यासह बेल्टने अमानुष मारहाण केली. या गँगमधील तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पीडित मुलाच्या तोंडावर मूत्रविसर्जन करून माणुसकीला काळीमा फासली. हडपसर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. मन हेलावून टाकणारी घटना 12 मार्च रोजी मांजरी परिसरात घडली आहे. 16 वर्षीय मुलाला पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक कारणातून पीडित मुलाचा या गँगमधील तरुणांसोबत वाद झाला. त्यानंतर या गँगने कोयत्याचा धाक दाखवून रेल्वे स्टेशनच्या परिसरात नेलं. तिथे नेल्यावर या पाचही जणांनी या मुलाला बेल्टने मारहाण सुरू केली. या टोळक्याने या मुलाला अर्धनग्न केलं आणि लाथाबुक्याने आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. बेदम झालेल्या या मारहाणीत हा मुलगा अखेर बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतरही ही टोळकी इथं थांबली नाही. त्यांनी त्याच्या तोंडावर मूत्रविसर्जन केलं आणि पसार झाले. हा मुलगा दोन दिवसांपासून बेशुद्ध असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.  या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी या आरोपी तरुणांची ओळख पटवली आहे. हे सर्व जण कुख्यात गुन्हेगार असून कोयत्या गँगचे सदस्य आहे. या व्हिडिओच्या आधारे पाचही तरुणांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.
First published: