साईमंदिरात बेवारस सापडलेल्या चिमुरडीची निर्दयी आई परतली, पण...

साईमंदिरात बेवारस सापडलेल्या चिमुरडीची निर्दयी आई परतली, पण...

साई मंदिरात बेवारस सोडलेल्या चिमुरडीची निर्दयी आई अखेर रविवारी शिर्डीत दाखल झाली. मात्र, तिने या आपल्या मुलीचा स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला.

  • Share this:

शिर्डी, 2 जून- साई मंदिरात बेवारस सोडलेल्या चिमुरडीची निर्दयी आई अखेर रविवारी शिर्डीत दाखल झाली. मात्र, तिने या आपल्या मुलीचा स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला. पतीला सोडल्यानंतर प्रियकरापासून झालेल्या मुलीचा प्रियकर आणि नवरा स्विकार करत नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे मुलीला मंदिरात सोडल्याचे ती म्हणाली.

काही दिवसांपूर्वी साई मंदिरात सोडलेल्या चिमुकलीला पाहण्यासाठी तिची आई पुन्हा आल्याने साई संस्थानचा जीव क्षणासाठी का होईना भांड्यात पडला होता. मात्र, आईने मुलाचा सांभाळ करण्यास साफ नकार देत मुलीला आपण इथेच सोडणार असल्याचं सांगितलं. ही महिला जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे. पतीसोबत काडीमोड घेऊन ती प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकरापासून झालेल्या मुलाचा सांभाळ करण्यास प्रियकराने नकार दिल्याने त्या मुलीला मंदिरात सोडल्याची कबुली या निर्दयी आईने दिली. मात्र, आता मुलीला परत नेणार नाही अशी भूमिका तिने घेतल्यामुळे साई संस्थानसमोरही पेच निर्माण झाला आहे.

नवरा मला स्विकार करायला तयार आहे. मात्र, मुलीला स्विकारायला तयार नाही. प्रियकरानेही या चिमुकलीला नाकरलं आहे. त्यामुळे आपण मुलीला सोडलं असून तिला घेऊन जाणार नसल्याचेही तिने सांगितले.

नकोशा मुलांचा सांभाळ करतात गणेश दळवी!

निर्दयी मातापित्याने टाकून दिलेल्या मुलामुलींचा शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश दळवी हे अनेक वर्षांपासून सांभाळ करत आहेत. समाजामध्ये असलेला शिक्षणाचा अभाव, प्रेमप्रकरणातून झालेलं अपत्य, फसवणूक यातून अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आश्रमात राहणारे लहान लहान निरागस चेहरे पाहून अनेकांचे डोळे पाणावतात. काय दोष आहे या चिमुकल्यांचा? यांच्या निर्दयी मातापित्यांनी त्यांना या निष्ठूर जगात एकट्याने सोडून दिले जाते. अशा जन्मदात्यांना खरंच मातापिता म्हणावं का, हा खरा प्रश्न आहे. मुली सर्वांना नकोशा झाल्या आहेत, अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी समाजाने आणि शासनाने पावले उचलण्याची गरज असल्याचे गणेश दळवी यांनी सांगितले.

एक वर्षाच्या आतील चिमुरड्यांसाठी साई संस्थानने घेतला हा निर्णय

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येताना तुमच्यासोबत एक वर्षाच्या आतील बाळ असेल तर त्याची संस्थानच्या रजिस्टरमध्ये आता नोंद करावी लागणार आहे. दरम्यान, साईमंदिरात शुक्रवारी एका महिलेने आपल्या पाच महिन्यांच्या मुलीला बेवारस सोडून दिले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून साई संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे साईमंदिराचे कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

भाविक मंदिर परिसरात पाच गेटमधून प्रवेश करतात. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी त्यांची ओळख पटवणे अवघड जाते. यावर उपाय म्हणून आता एक वर्षाच्या आतील अपत्यास साई मंदिरात नेताना पालकांना आता गेटवरील रजिस्टरमध्ये नाव, पत्ता , मोबाईल क्रमांकांची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. संस्थानने आजपासून याची अंमलबजावणी सुरू केल्याचे दीपक मुळगीकर यांनी माहिती दिली आहे.

VIDEO: मातृत्वाला काळीमा! पोटच्या मुलीला दिलं मंदिरात सोडून

First published: June 2, 2019, 5:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading