कुडाळ, 08 सप्टेंबर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ याठिकाणी मंगळवारी नोटांनी भरलेली एक पिशवी (Found bag with full of notes) आढळली आहे. या बंद पिशवीत आढळलेल्या नोटांची पडताळणी केली असता, संबंधित नोटा बनावट (fake currency found) असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. लवकरच याप्रकरणी तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी सकाळी कुडाळ भाजी मार्केट परिसरातून जाणाऱ्या बागवान यांना एक बंद पिशवी आढळली होती. या पिशवीत शंभर रुपयांच्या नोटेचे बंडल असलेल्या 5 लाख 25 हजार रुपयांच्या नोटा होत्या. एवढी मोठी रक्कम सापडल्यानं बागवान यांनी या घटनेची माहिती कुडाळ पोलिसांना दिली. कुडाळ पोलिसांनी सापडलेल्या या नोटांची पडताळणी केली असता, संबंधित नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच याचा तपास सुरू केला जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा-फेसबुकवरील 'ती' फ्रेंड निघाला 'तो', दिल्लीच्या डॉक्टराला तब्बल 2 कोटींना गंडवलं!
खरंतर, सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा बाजारात आणण्याचा तस्करांचा डाव असू शकतो, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात अनेक गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात. गावागावातून कोकणात येणारे गणेशभक्त गडबडीनं खरेदी करून आपल्या गावी परत जातात. याचाच फायदा घेऊन चलनात बनावट नोटा आणण्याचा डाव काहींनी आखला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा-एअरपोर्टवर सापडली मानवी कवटी, साध्वीच्या बॅगेतील साहित्य पाहून कर्मचारी चक्रावले
याचाच एक भाग म्हणून कुडाळ याठिकाणी 5 लाख 25 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याचा संशय पोलिसांना आहे. हे एक मोठं रॅकेट असू शकतं, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून पुढील कारवाईची तयारी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.