• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • उल्हासनगरमध्ये भरदिवसा 5 गुंडांनी केली तरुणाची हत्या, घटनेचा LIVE VIDEO

उल्हासनगरमध्ये भरदिवसा 5 गुंडांनी केली तरुणाची हत्या, घटनेचा LIVE VIDEO

उल्हासनगरमधील  कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली.

  • Share this:
उल्हासनगर, 18 सप्टेंबर : उल्हासनगरमध्ये (ulhasnagar) दिवसेंदिवस वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या (crime) घटनांमुळे परिसर हादरून गेला आहे. आज पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प 4 च्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर निर्घृणपणे (murder) हत्या केली आह हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील  कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली होती. हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ही हत्या करणाऱ्या आणि विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असलेल्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना अटक केली. हिललाईन आणि विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात ही कामगिरी केली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे. मामाने केला भाचीवर बलात्कार दरम्यान, मामा भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.  पोलिसांनी या नराधम मामाला अटक केली आहे.  एका 6 वर्षाच्या चिमुरडीवर मामानेच अत्याचार केल्याची  घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. लग्नानंतर कौमार्य सिद्ध करण्याच्या दबावात मुली उचलताहेत हे भयंकर पाऊल अत्याचार करणारा मामा हा पीडित कुटुंबीयांच्या शेजारी राहतो. तो पीडित चिमुरडीला त्यांच्यासोबत खेळण्याच्या बहाण्याने घरी घेऊन जात होता. यावेळी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. तीन दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने तिच्यावर अत्याचार करताना या मामाला पाहिले. त्यानंतर त्याने तत्काळ त्याच्या आईला घटनेची माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने तात्काळ हिललाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला.
Published by:sachin Salve
First published: