Home /News /maharashtra /

ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओ रोडच्या खाली उतरली आणि पलटली, ड्रायव्हर वाचला अन् 5 मित्र...

ओव्हरटेक करताना स्कॉर्पिओ रोडच्या खाली उतरली आणि पलटली, ड्रायव्हर वाचला अन् 5 मित्र...

पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे येत असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात झाला.

जालना, 27 जुलै :  मित्राच्या लग्नासाठी जात असताना भरधाव स्कॉर्पिओ गाडीला (mahindra scorpio car accident) जालन्यात (jalana) भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले आहे. तर दोन जणांची प्रकृती ही गंभीर आहे. या अपघातातून ड्रायव्हर मात्र, सुखरूप बचावला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव (shegaon) तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे येत असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात झाला.  अंबड तालुक्यातील झिर्पि फाटा येथे ही घटना घडली. हेल्दी राहण्यासाठी रोज खा मनुका; दात,त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक पाचही मित्र स्कार्पिओ MH 16-CQ-2264 गाडीने जात होते. झिर्पि फाट्याजवळ पोहोचले असताना एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना समोरच्या वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे स्कार्पिओ चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि गाडी महामार्गाच्या खाली 15 ते 20 फूट खोल शेतात पलटी झाली. पलटी होत गाडी जाऊन एक ठिकाणी थांबली. या भीषण अपघातात स्कार्पिओ चालक हरिभाऊ झाम्बरे यांना काहीच झाले नाही. त्यांना साधे खरचटले सुद्धा नाही. दैव बलवत्तर म्हणून यादुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चेरापुंजीलाही मागे टाकलं कोयनानगरच्या या गावानं; 746 मिमी पावसाने झालं उद्ध्वस्त मात्र, गाडीतील पाच मित्र जखमी झाले आहे. यातील गंभीर जखमी पैकी महेश राजकुमार घोरतळे (वय २७) हे फ्रॅक्चर असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अक्षय बबन भोसले (२४) यांच्यावर जिल्हा रुग्णालय जालना जेथे उपचार घेत आहे. तर नौशाद मणियार (२६) यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. किरकोळ जखमी असलेल्या जखमींवर अंबड ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठवून दिले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या