औरंगाबाद, 23 ऑगस्ट : सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय दिवस-रात्र ड्यूटीवर तैनात असलेल्या पोलीस विभागातीलही अनेकांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये अनेक योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यातच औरंगाबादमधील जनतेसाठी लढणारी आणि जनसेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा वाहन चालक आणि बंगल्यातील कर्मचारी अशा 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर अधिकारी मोक्षदा पाटील व त्यांचा मुलगा व पती यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर आम्ही स्वत:ला 5 दिवसांसाठी क्वारंटाईन केलं आहे, मोक्षदा पाटील यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.
5 employees of my bungalow and my driver have tested #COVID19 positive. I, my son and my husband have been tested and we are negative. But as a precaution, we have all quarantined ourselves for 5 days.
त्यांच्या ट्विटनंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. व मोक्षदा पाटील यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मोक्षदा पाटील या औरंगाबाद ग्रामीण भागात पोलीस अधिक्षक आहेत.