मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; गाडीचा अक्षरशः चक्काचूर, 5 जणांचा जागीच मृत्यू

एसटी बस आणि कारचा भीषण अपघात; गाडीचा अक्षरशः चक्काचूर, 5 जणांचा जागीच मृत्यू

उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला.

उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला.

उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नितीन कुमार, प्रतिनिधी

 लातूर 04 ऑक्टोबर : उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारमधील मयत 5 जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.

Pune Narayangaon Accident : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 4 वेळा पलटली कार, दोघांचा मृत्यू, LIVE VIDEO

उदगीर आगाराची बस आगारातून चाकूरकडे रवाना झाली होती. दरम्यान, बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहाजण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. तसंच घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केलं. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमोपचार दिले गेले. दरम्यान सद्यस्थितीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसून अपघातास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार

मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समोर येत आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. तर, जखमींवर उपचार सुरू आहेत.

First published:
top videos

    Tags: Major accident, Road accident