Home /News /maharashtra /

Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari : 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटले अन् एकमेकांना कोरोना देऊन गेले

Uddhav Thackeray and Bhagat Singh Koshyari : 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटले अन् एकमेकांना कोरोना देऊन गेले

मुंबईकडे (mumbai) रवाना होणार होते ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagatsinh koshyari) यांची भेट घेणार होते. परंतु राज्यपाल कोश्यारी यांची कोरोना चाचणी (corona test) पॉझिटिव्ह आल्याने त्यांची भेट टळली आहे.

  मुंबई, 22 जून : एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार (shiv sena mla) फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला (eknath shinde in guwahati) दाखल झाले. या दरम्यान एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार होते ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. परंतु राज्यपाल कोश्यारी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांची भेट टळली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राज्यपाल आणि मुख्यमंत्री मागच्या 5 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमीत्त भेटले होते. मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटल्याने ते एकमेकांना कोरोना देऊन गेले असल्याची चर्चा होत आहे.

  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवसादिवशी अनेक नेत्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. दरम्यान दोघे एकमेकांना मास्क न घालता भेटले होते. त्यांना इथेच कोरोनाची लागण झाली आहे का अशीच चर्चा सुरू आहे.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहण्याची शक्यता

  राजभवनात जात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी उपस्थित पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर हात ठेवत आशिर्वादही दिले होते.

  शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. पण अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे मात्र आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

  हे ही वाचा : पुढच्या 3 तासांत बदलू शकतं महाराष्ट्राचं चित्र; या आहेत 3 मोठ्या शक्यता

  दरम्यान एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे.सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला Cisf ची सुरक्षा असणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Corona, Governor bhagat singh, Mumbai, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या