Home /News /maharashtra /

Ratnagiri: बँक मॅनेजरसह 23 जणांनी युनियन बँकेला लुटलं; 5 कोटींचा लावला चुना, कांड वाचून बसेल धक्का

Ratnagiri: बँक मॅनेजरसह 23 जणांनी युनियन बँकेला लुटलं; 5 कोटींचा लावला चुना, कांड वाचून बसेल धक्का

Crime in Ratnagiri: रत्नागिरी शहरातील युनियन बँकेला तब्बल 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

    रत्नागिरी, 05 जानेवारी: बनावट पिक कर्जाच्या नावाखाली रत्नागिरी (Ratnagiri) शहरातील युनियन बँकेला तब्बल 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांचा गंडा (5 crore money fraud in union bank) घातल्याची घटना उघडकीस आली आहे. बँक मॅनेजरच्या संगनमतानेच हा गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी बँक मॅनेजरसह एकूण 23 जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आंबा पिकपाणीसाठी कर्ज मंजूरीसाठी काही बनावट कागदपत्रे तयार केली होती. संबंधित कागदपत्रे खरी असल्याचं भासवून बँक मॅनेजरला हाताशी धरून ही कर्ज मंजूर करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर मंजूर झालेल्या रकमेचा वापर आंबा पिकासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. तसेच सदर कर्जाची परतफेड करण्यास देखील आरोपींनी टाळाटाळ केली आहे. हेही वाचा-मुलाने सुपारी देऊन केला वडिलांचा खून, नाराजीचं कारण ऐकून येईल संताप शिवाय बँकेत सादर केलेल्या कागदपत्रांची कसलीही शहानिशा न करता, बँक मॅनेजर एस प्रशांत यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत संबंधित कर्ज मंजूर केलं आहे. बँकेने केलेल्या कार्यकालीन चौकशीत बँक मॅनेजर एस प्रशांत हे दोषी आढळले आहेत. त्यानंतर वीरेश चंद्रशेखर यांनी रत्नागिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणूकीसह अधिकाराचा गैरवापर अशा विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-रेल्वे कर्मचाऱ्यानंच लुटले काउंटरवरचे पैसे, रचलं दरोड्याचं नाटक; असा लागला छडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील 20 शेतकऱ्यांनी आंबा पिकपाणी कर्जासाठी युनियन बँकेत अर्ज केला होता. त्यासाठी बनावट कागदपत्रे जमा केली होती. संबंधित 20 शेतकऱ्यांना अवैध पद्धतीने तब्बल 5 कोटी 12 लाख 98 हजार रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं. संबंधितांनी या कर्जाचा वापर आंबा पिकासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी केला आहे. हे प्रकरण सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Money fraud, Ratnagiri

    पुढील बातम्या