मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कल्याण डोंबिवलीत शिवसेना देणार भाजपला धक्का, 5 नगरसेवक करणार प्रवेश?

कल्याण डोंबिवलीत शिवसेना देणार भाजपला धक्का, 5 नगरसेवक करणार प्रवेश?

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपचे हे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण, 21 नोव्हेंबर : कोरोनामुळे लांबलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीचा (kalyan dombivli municipal corporation election ) कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पण कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना (shivsena) भाजपला (bjp) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्याआधीच शिवसेना सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या तयारीत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर होणार आहे. भाजपाचे ५ नगरसेवक सेनेत प्रवेश करणार आहे.  खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपचे हे 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मुंबईमध्ये 15-20 नगरसेवक सेनेच्या वाटेवर?

तर दुसरीकडे मुंबई महापालिकाची निवडणुकीच्या (mumbai municipal corporation) निमित्ताने  शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी (yashwant jadhav) भाजपचे ( BJP corporators will join Shiv Sena ) 15 ते 20 नगरसेवक डिसेंबर महिन्याच्या आधी सेनेत (shivsena) प्रवेश करतील, असा दावा करून एकच धुरळा उडवून दिला आहे.

यशवंत जाधव यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी सत्ताधारी विरूद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे. 15 ते 20 भाजप नगरसेवक हे डिसेंबर महिन्यापर्यंत निवडणुकीत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश करणार आहे. हे नगरसेवक भाजपच्या नेतृत्त्वाला ते कंटाळून गेले आहे. डिसेंबरमध्ये धमका पहायला मिळेल,  असा दावा मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशंवत जाधव यांनी केला आहे. पण भाजपने आमचे कुठलेही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार नाही, असा दावा केला आहे.

First published: