उस्मानाबाद, 01 जून: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) तालुक्यात एका शेतकऱ्याचा पराक्रम पाहून पोलीसही हैराण झाले आहे. या शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा (Hemp) जप्त करण्यात आला आहे. या शेतकऱ्याने कडब्याच्या गंजीत 10 पोते लपवून ठेवले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मस्सा गावात ही घटना उजेडात आली आहे. बालाजी काळे, राजेंद्र छगन काळे असं या आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.
250 ग्रॅमचा ट्रान्सफॉर्मेबल रोबोट चंद्रावर जाणार...
मस्सा खंडेश्वरी शिवारात मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर कळंब पोलिसांनी बालाजी काळे याच्या शेतात छापा टाकला. शेतात कडब्याची गंजीची पाहणी करण्यात आली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. तब्बल 47 पोत्यांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी संपूर्ण गांजा जप्त केला. त्याची मोजणी केली असता एकूण 47 पोत्यांमध्ये गांजा आढळून आला. एकूण 1132.66 किलो गांजा जप्त केला आहे, त्याची किंमत 1 कोटी 24 लाख इतकी आहे.
कर्ज घेतलंय? 'या' चुका अजिबात करू नका, बसू शकतो मोठा फटका
पोलिसांनी बालाजी काळे आणि राजेंद्र काळे या दोघांना अटक केली आहे. तर चार जणांवर कळंब पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. हे चार ही आरोपी फरार आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
जिल्ह्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट असण्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.