सातारा, 08 ऑक्टोबर: साताऱ्यात हत्येची एक थरारक (Brutal Murder) घटना समोर आली आहे. सातारा शहरातील दिव्यानगरी परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या (Crushed with stone and murder) करण्यात आली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला झालेल्या तरुणाला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारदरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधात पोलीस पथकं रवाना झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संतोष ऊर्फ विठ्ठल सुळ असं हत्या झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. मृत सुळ हे आज सकाळी अकराच्या सुमारास सातारा शहरातील दिव्य नगरी परिसरातील रस्त्यावरून जात होते. दरम्यान याठिकाणी अचानक आलेल्या एका टोळक्यानं सुळ यांचा रस्ता आडवला. तसेच त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्यानं आणि दगडानं मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी अचानक केलेल्या या हल्ल्यात सुळ यांना पळूनही जाता आलं नाही.
हेही वाचा- कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत अत्याचाराचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना
आरोपींनी अमानुष पद्धतीनं सुळ यांच्यावर अनेक वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की सुळ घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर बराच काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. आणि जखमी अवस्थेतील संतोष सुळ यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
हेही वाचा-धक्कादायक! मदत करणाऱ्या मामाच्या मुलीचाच काढला काटा; आधी गाडीवर बसवलं आणि मग...
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सुळ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आरोपींनी आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी काही पथकं तयार करण्यात आली असून ही पथकं आरोपींच्या शोधात रवाना झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Satara