मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

हृदयद्रावक! अखेर मृत्यूशी झुंज संपली, नांदेडात 45 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

हृदयद्रावक! अखेर मृत्यूशी झुंज संपली, नांदेडात 45 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

(फोटो- दिव्य मराठी)

(फोटो- दिव्य मराठी)

Farmer Suicide in Nanded: नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

    नांदेड, 22 डिसेंबर: महाराष्ट्रातील मराठवाडा हा प्रदेश शेतकऱ्यांसाठी नेहमीच 'सुसाईड झोन' बनून राहिला आहे. गेल्या काही वर्षात याठिकाणी हजारो शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. यामध्ये आता आणखी एका शेतकऱ्याची भर पडली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील एका 45 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन (Farmer Commits suicide by drinking poison) करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आत्महत्येच्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तम पुंजाराम गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या 45 वर्षीय शेतकऱ्याचं नाव असून ते  हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील रहिवासी आहे. त्यांनी 19 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी जीवाचं रान करत त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हेही वाचा-बाप नजरेआड होताच साधला डाव; मुलीसोबत क्रूरतेचा कळस, भयावह स्थितीत आढळली तरुणी उत्तम गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच गावात शोककळा पसरली आहे. अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पाश्चात आई, पत्नी, दोन मुलं, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पळसपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हेही वाचा-डान्स शिकवण्याच्या नावाखाली सुरू होता भलताच उद्योग; टीचरचं कृत्य वाचून हादराल खरंतर यावर्षी नांदेडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पिकांसह वाहून गेली होती. तर कित्येक शेतात पाणी साचून पिकं सडली होती. हातातोंडाला आलेला घास अस्मानी संकटाने अशाप्रकारे हिरावल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. शेतीची नासाडी झाल्याने अल्पभूधारक शेतकरी उत्तम गायकवाड देखील हतबल झाले होते. शेतात पीक न आल्याने डोक्यावर कर्ज कसं फेडायचं? याची चिंता त्यांना सतावत होती. याच विवंचनेतून त्यांनी 19 डिसेंबर रोजी विष प्राशन केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nanded, Suicide

    पुढील बातम्या