Home /News /maharashtra /

चांगुलपणा नडला! मध्यस्थी करायला गेला अन् मारेकऱ्यांचा ठरला बळी, बीडमधील घटना

चांगुलपणा नडला! मध्यस्थी करायला गेला अन् मारेकऱ्यांचा ठरला बळी, बीडमधील घटना

Murder in Beed: एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं देखील किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. बीडमध्ये भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला आहे.

    बीड, 24 जानेवारी: एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं देखील किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. भाच्याच्या हॉटेलात जेवण केल्यानंतर काही तरुणांनी बिल देण्यावरून त्याच्याशी वाद घातला. यावेळी मध्यस्थी करायला गेलेल्या मामाला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित तरुणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करत हॉटेल चालकाच्या मामाचा जीव घेतला आहे. केवळ बिल देण्याच्या कारणातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. किशोर नंदलाल गुरखुदे असं हत्या झालेल्या 43 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते बीड शहरातील जव्हेरी गल्ली येथील रहिवासी आहे. मृत गुरखुदे हे पानटपरीचालक असून बसस्थानक परिसरात त्यांची छोटंस दुकान आहे. तर याच परिसरात त्यांच्या भाच्याचं हॉटेल आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी रविवारी मारेकरी तरुणी मृत व्यक्तीच्या भाच्याच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या बिलावरून भाच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हेही वाचा-डॉक्टरची पत्नी कुरिअर बॉयच्या पडली प्रेमात; 2 वर्षे लिव्ह इनमध्ये, नंतर मात्र... भाच्यासोबत तरुण भांडत असल्याचं पाहून मृत किशोर गुरखुदे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. यावेळी संतापलेल्या आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याच्या सहाय्याने किशोर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की, मामा जागीच जखमी अवस्थेत कोसळले. यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या ठिकाणी उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. हेही वाचा-न्यूड डान्स, गँगरेप,प्राइवेट पार्टला चटके देत पत्नीला टॉर्चर;बिल्डरचा नवा खुलासा या प्रकरणी चार आरोपींविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी खुनासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संबंधित सर्व आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed, Crime news, Murder

    पुढील बातम्या