आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा, 40 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार!

आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा, 40 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींवर केला अत्याचार!

घरी कुणीही नसल्याने या नराधमाने शेतावर लागून असलेल्या लाखोरीच्या शेंगा खावून येवू असं सांगत आपल्या नातीला आणि घरा शेजारी राहणाऱ्या मुलीला सोबत घेऊन गेला.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी

गोंदिया, 11 फेब्रुवारी : गोंदिया जिल्ह्यातील आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या नराधमाने आपल्याच नातीवर दुष्यकृत्य केलंय.

गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर गावात 5 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या 40 वर्षीय नराधमाने घरी कुणीही नसल्याने  शेतावर लागून असलेल्या लाखोरीच्या शेंगा खावून येवू असं सांगत आपल्या नातीला आणि घरा शेजारी राहणाऱ्या  मुलीला सोबत घेऊन गेला. या दोन्ही मुलींचं वय अनुक्रमे 7 आणि 8 वर्ष आहे.

शेतावर नेऊन या नराधमाने दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर या प्रकरणाची कुठेही वाच्यात होऊ नये म्हणून त्याने पीडित मुलींना 10 रुपयांचं आमिष दिलं.

परंतु, घरी गेल्यानंतर या पीडित मुलींना वेदना झाल्याने याची माहिती पीडितेनं आईला दिली. त्यानंतर  आपल्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. मुलींनी सांगितलेल्या माहितीनंतर कुटुंबाला एकच हादरा बसला.

त्यानंतर नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून नराधम आजोबा विरोधात गुन्हा दाखल केली. आरोपी विरोधात गोंदिया ग्रामीण पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्याच्या विरोधात बाललैगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Facebook वर लहान मुलांचे अश्लील फोटो टाकणाऱ्या 17 जणांवर मुंबईत कारवाई

दरम्यान, फेसबुकवर लहान मुलांचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ प्रसारीत केले जात असल्याचे उघड झाले आहे. खुद्द फेसबुकने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून वसई विरार परिसरातील 17 फेसबुक खात्यांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतात फेसबुक आणि व्हॉटसअप हे सर्वात प्रभावी समाज माध्यम आहेत. फेसबुकचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. संदेशवहन आणि सर्वांशी एकत्रित सुसंवाद साधण्यासाठी फेसबुकचा वापर होतो. मात्र याच फेसबुकवरून लहान बालकांचे अश्लिल साहित्य (चाईल्ड पोर्नोग्राफी) प्रसारीत केले जाऊ लागले आहे. भारताततून सर्वाधिक चाईल्ड पोर्नोग्राफी ही फेसबुकच्या माध्यमातून केली जात असल्याचे फेसबुकनेच जाहीर केले आहे.

ही ''चाईल्ड पोर्नोग्राफी'' रोखण्यासाठी फेसबुकने केंद्र सरकारला विनंती केली होती. ज्या राज्यातून, शहरातून आणि ज्या ठिकाणाहून (आयपी अॅड्रेस) बालकांचे अश्लील साहित्य, चित्रफिती, छायाचित्रे प्रसारीत (अपलोड) केली जात आहेत, त्यांची यादीच फेसबुकने केंद्र सरकारला दिली होती. भारतात सर्वाधिक फेसबुक चाईल्ड पोर्नोग्राफी ही दिल्लीतून होते तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकातून होत असल्याचे फेसबुकने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

या प्रकरणी अद्याप कुणाला अटक कऱण्यात आलेली नाही. ज्या आयपी अॅड्रेसवर (खात्यावर) गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व 20  ते 35 वर्ष वयोगटातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे फेसबुक वापरणाऱ्यांनी आपले अकाऊंट सेफ आहे ना याची खात्री नक्कीच केली पाहिजे.

First published: February 11, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या