मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लोखंडी शिडी सरकवताना मोठा अपघात; अमरावतीत विजेच्या धक्क्याने चौघांचा तडफडून मृत्यू

लोखंडी शिडी सरकवताना मोठा अपघात; अमरावतीत विजेच्या धक्क्याने चौघांचा तडफडून मृत्यू

Crime News: अमरावतीतील एका प्रसिद्ध महाविद्यालयात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 25 फूट उंचीची शिडी सरकवत असताना विजेचा धक्का बसून चार कर्मचाऱ्यांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

अमरावती, 29 डिसेबर: अमरावतीतील एका प्रसिद्ध महाविद्यालयात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. संबंधित महाविद्यालयात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा विजेचा हाय होल्टेज झटका लागल्याने (4 employee died after get electricity shock) तडफडून मृत्यू झाला आहे. संबंधित सर्व कर्मचारी एक लोखंडी शिडी (Iron ladder) बाजूला सरकवत होते. यावेळी वरून गेलेल्या हाय होल्टेज तारांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. यातून हा मोठा अपघात घडला आहे. या अपघाताची घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली असून घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश झाला आहे.

ही घटना अमरावती शहरातील कठोरा मार्गावर पी. आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर रंगकाम सुरू होतं. प्रवेशद्वाराची उंची जास्त असल्याने भिंतींना रंग देण्यासाठी 25 फूट लोखंडी शिडीचा वापर केला जात होता. आज सकाळी बाराच्या सुमारास प्रवेशद्वारावरील रंगकाम पूर्ण झालं होतं.

हेही वाचा-हंडाभर पाण्यासाठी शेतकऱ्याचा घेतला जीव, कुऱ्हाडीने घाव घालत केलं रक्तबंबाळ

त्यामुळे संबंधित लोखंडी शिडी दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इन्स्टिट्यूटच्या देखभाल व दुरुस्ती विभागातील चार कर्मचारी 25 फूट लांब शिडी बाजूला सरकण्यासाठी गेले होती. शिडी सरकवत असताना प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या 11 किलो वॅटच्या विद्युत वाहिनीकडे कर्मचाऱ्यांचं दर्लक्ष झालं. यावेळी 25 फुटी लोखंडी शिडीचा स्पर्श विद्युत वाहिनीला स्पर्श होताच, हाय होल्टेज विद्युत प्रवाह लोखंडी शिडीत उतरला.

हेही वाचा-श्रद्धांजली वाहायला आले अन् एकमेकांची फोडली डोकी, सरणावरील लाकडांनी केली मारहाण

हा अपघात इतका भयंकर होता की, चारही कर्मचाऱ्यांचा घटनास्थळी तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयीन प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर, चारही कर्मचाऱ्यांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. एकाच वेळी चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Amravati, Crime news