बुलडाणा, 26 ऑक्टोबर: आज सकाळी दहाच्या सुमारास बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील चिखली खामगाव मार्गावरील वैरागड येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात (road accident at chikhali khamgaon road) झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच तडफडून मृत्यू (4 died in terrible road accident) झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले (7 injured) आहेत. संबंधित सातही जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात वैरागड गावाजवळील एका छोट्या घाटात झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो गाड्या सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात होत्या. तर महावितरण कंपनीची सुमो कार खामगावकडून चिखलीच्या दिशेने जात होती. दरम्यान वैरागड गावाजवळील मोहाडी घाटात संबंधित तीन वाहनांना भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये महावितरणाच्या सुमो कारचा चुराडा झाला असून गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे.
हेही वाचा-मुंबई क्राइम ब्रांचची मोठी कारवाई; 24 किलो चरससह चौघे जेरबंद, 2 महिलांचा समावेश
या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित सातही गंभीर जखमी रुग्णांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana news, Road accident