Home /News /maharashtra /

चंद्रपूरमधील संपूर्ण गाव डायरियाच्या विळख्यात; दूषित पाण्यामुळे चौघांचा मृत्यू, शेकडो लोक रुग्णालयात

चंद्रपूरमधील संपूर्ण गाव डायरियाच्या विळख्यात; दूषित पाण्यामुळे चौघांचा मृत्यू, शेकडो लोक रुग्णालयात

नळ योजनेंतर्गत ग्रामस्थांच्या घरापर्यंत जाणार्‍या पाईप लाईनला लिकेज असून ही पाईपलाईन घाण नाल्यातून जात असल्याने नाल्यातील पाणी नळातून लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे

    चंद्रपूर 06 ऑगस्ट : महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील राजुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या देवडा गावातील लोकांना डायरियासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. गावातील चार लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक रुग्णालयात दाखल आहेत. गावातील नळांला दूषित पाणी येत आहे, त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. मुंबई एअरपोर्टवर पकडला! इतक्या कोटींचे हेरॉईन कॅप्सूल निघाले पोटातून; 25 तास शौचासही नव्हता गेला नळ योजनेंतर्गत ग्रामस्थांच्या घरापर्यंत जाणार्‍या पाईप लाईनला लिकेज असून ही पाईपलाईन घाण नाल्यातून जात असल्याने नाल्यातील पाणी नळातून लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. पाईपलाईन लिकेज असूनही लोकांना हेच पाणी प्यावं लागत आहे. त्यामुळे संपूर्ण गावच डायरियाच्या विळख्यात आहे. गावात हा त्रास इतका वाढला आहे की शेकडो लोकांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे, तर आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. डायबेटिस रुग्णांना मोठा दिलासा! आता इन्सुलिन इंजेक्शनची गरजच पडणार नाही, उपचाराचा नवा मार्ग सापडला गावातील चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन शुद्धीवर आलं असून, गावात आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं जात आहे. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. या संकुलात चार गावे डायरियाने बाधित असली तरी सर्वाधिक बाधित देवडा गाव आहे. हे संपूर्ण गाव डायरियाच्या विळख्यात आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Chandrapur, Drink water

    पुढील बातम्या