हिंगोली, 14 जून: नांदेडवरून बुलडाण्याकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव याठिकाणी भीषण अपघात (Car road accident) झाला आहे. या अपघातामध्ये चारचाकीत बसलेल्या चारही जणांचा जागीच मृत्यू (4 deaths) झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात घडला असून घटनेत मृत्यू झालेले सर्व नागरिक लोणार तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे (negligence of contractor) या चार जणांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काम सुरू असल्याचा दिशादर्शक फलक न लावल्याने ही कार थेट खड्ड्यात कोसळली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव याठिकाणी मागील दोन वर्षांपासून राज्य महामार्गावरील पुलाचं काम रखडलेलं आहे. या पुलाचं काम सुरू असताना देखील याठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावण्यात आलेला (lack of sign board) नाही. त्यामुळे रात्री पाऊस सुरू असताना रस्त्यातील खड्डा न दिसल्यानं हा अपघात घडला आहे.
चारचाकी थेट एका मोठ्या खड्ड्यात जाऊन कोसळली (car crashed into ditch) आहे. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याठिकाणी यापूर्वीही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे, अनेकदा अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. तर एकाला हात गमवावा लागला आहे. याठिकाणी वारंवार अपघात घडत असूनही ठेकेदाराने दिशादर्शक फलकाची सोय केली नाही. त्यामुळे पुन्हा अपघात घडून चार जणांचा बळी गेला आहे.
हे ही वाचा-फुगे विकून घरी परतणाऱ्या बापलेकीवर काळाचा घाला; वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू
मागील दोन वर्षांपासून पुलाचं काम सुरू असूनही कामात कोणतीही गती आली नाही. सोबतच दिशादर्शक फलक न लावल्यानं नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित जबाबदार लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Road accident