मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शहरात आधी तलवारी नाचवल्या, पोलिसांनी गजाआड केल्यावर आढळला धक्कादायक रिपोर्ट!

शहरात आधी तलवारी नाचवल्या, पोलिसांनी गजाआड केल्यावर आढळला धक्कादायक रिपोर्ट!

अंबरनाथ पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत अवघ्या काही तासात यातील 4 सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने मोठा अनर्थ टळला होता

अंबरनाथ पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत अवघ्या काही तासात यातील 4 सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने मोठा अनर्थ टळला होता

अंबरनाथ पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत अवघ्या काही तासात यातील 4 सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने मोठा अनर्थ टळला होता

मुंबई, 14 मे :  महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आतापर्यंत 7 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये पोलिसांनी मोठ्या हिंमतीने पकडलेल्या अटल गुन्हेगारांना कोरोनाची लागण असल्याची बाबसमोर आली आहे. अंबरनाथ पोलीस ठाण्यातील चार सराईत गुन्हेगारांना पोलिस कोठडीतच कोरोनाची लागण झाली आहे. मागील आठवड्यात अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरात एका टोळीने हातात तलवारी घेऊन फिरत दहशत निर्माण  केली आणि चार जणांवर हल्ला केला. हेही वाचा - लघुशंका करून येतो म्हणून गेला आणि जंगलात पळाला,पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून तरुण गायब यावेळी अंबरनाथ पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावत अवघ्या काही तासात यातील 4 सराईत गुन्हेगारांना गजाआड केल्याने मोठा अनर्थ टळला होता. या सगळ्यांना न्यायालयाकडून 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पोलीस कोठडीत असतांना या सराईत आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. त्याना कोरोनाची कोणतेही लक्षणे नसतानाही त्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हेही वाचा - व्हायरसला दूर ठेवणारं PPE किट झालं तयार, कोरोनाविरूद्धच्या लढाईत यश सध्या या सगळ्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या गुन्हेगारांच्या संपर्कातील इतर 3 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. उल्हासनगर लवकरच गाठणार कोरोनाची शंभरी दरम्यान, दुसरीकडे उल्हासनगर शहरात कोरोनाचा रुग्णांचा वाढणारा आलेख धोकादायक आहे. उल्हासनगरमध्ये एकाच दिवशी 12 कोरोनाबाधित रुग्ण  आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर  65 वर्षीय वृद्धेचा कोरोनाचे मृत्यू झाला आहे. शहरात  कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 81 वर पोहोचली आहे. गेल्या   सहा दिवसात ब्राह्मणपाडा,सम्राट अशोक नगर भागासह 61 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या