मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापुरात वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुले गेली नदीत वाहून; शोधकार्य सुरू

सोलापुरात वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुले गेली नदीत वाहून; शोधकार्य सुरू

Solapur childrens drown: सोलापूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुलं नदीत वाहून गेली.

Solapur childrens drown: सोलापूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुलं नदीत वाहून गेली.

Solapur childrens drown: सोलापूर जिल्ह्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. वडिलांच्या डोळ्यादेखत 4 मुलं नदीत वाहून गेली.

सोलापूर, 29 मे: दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील लवंगी गावात आज दुपारच्या सुमारास एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नदीत पोहोण्यासाठी गेलेली चार मुले वडिलांच्या डोळ्यादेखत वाहून गेली. वाहून गेलेल्या चौघांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मुले वाहून गेल्याची माहिती मिळताच तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांकडून या मुलांचा शोध सुरू (search operation) आहे.

आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास लवंगी गावात राहणारे शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदीमध्ये (Bhima River) पोहण्यासाठी गेले होते. थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे त्यांच्या दोन मुली समीक्षा, आर्पिता आणि त्यांच्या सोबत मेव्हण्याचे मुलगा विठ्ठल, मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले. या चौघांनाही त्यांनी घरी पाठवले. शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले असताना थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले मुलगी समीक्षाला पोहता येत होते. परंतु अर्पिता थोडे थोडे पोहोता येत होते त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले.

VIDEO: रायगड, रत्नागिरी, पुण्याला मुसळधार पावसाने झोडपलं

समीक्षाला पाण्यात पोहत असताना आरतीने पकडले. अर्पिताला विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडत असताना त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत जाऊन समीक्षा आणि आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना कडेला जाण्यास सांगितले. तर शिवाजी यांनी अर्पिता आणि विठ्ठल यांना सोबत कडेला आणत असताना पाहिले असता समीक्षा आणि आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडाल्या. शिवाजींच्या ताब्यातील विठ्ठल आणि अर्पिता पण निसटले व ते पण वाहून गेले.

त्यावेळी शिवाजी यांचा ही धीर सुटल्याने तो पण बुडत असताना पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले.

भीमा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलांची नावे

समीक्षा शिवाजी तानवडे, वय 13 वर्ष, इयत्ता 8वी

अर्पिता शिवाजी तानवडे, वय 12 वर्ष, 7 वी

आरती शिवानंद पारशेट्टी, वय 12 वर्ष, 7 वी

विठ्ठल शिवानंद पारशेट्टी, वय 10 वर्ष, 5 वी

First published:

Tags: Solapur