कल्याण, 22 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीच्या (KDMC election 2022)तोंडावर शिवसेनेनं (Shiv Sena) सर्जिकल स्ट्राईक करत भाजपला धक्का दिला आहे. भाजपच्या चार विद्यमान नगरसेवकांसह भाजपचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. पण, त्याआधाची राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं भाजपला जबर धक्का देत खिंडार पाडलंय. भाजपचे चार विद्यमान नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.
महेश पाटील, सुनिता पाटील आणि सायली विचारे या तीन भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी सेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सुद्धा सेनेत प्रवेश केला आहे.
काँग्रेसची यादी जाहीर, कोल्हापूरमधून सतेज पाटील Vs महाडिक रंगणार सामना
कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपली आहे. कोरोना संकटामुळे केडीएमसी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाची लाट ओसरली असून कधीही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकते. त्यातच सेनेनं भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपचे पाच नगरसेवक आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना धक्का मानला जात आहे. पण, रवींद्र चव्हाण यांनी या पाचही नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हायकोर्टाचा समीर वानखेडेंना दणका, नवाब मलिकांना रोखण्यास दिला नकार
खरंतर कल्याण-डोंबिवलीला शिवेसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. कल्याणचे अनेक लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचेच आहेत. पण गेल्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारली होती. त्यावेळी राज्यात युतीचं सरकार होतं. तरीही शिवसेना आणि भाजप यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला 52 जागांवर यश मिळालं होतं. तर भाजपला तब्बल 42 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि भाजपच्या तुलनने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फार कमी जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 4, एमआयएमला 1 तर अपक्षांना 10 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्यानंतर आता आगामी माहापालिकेत नेमकं कोण बाजी मारतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: कल्याण डोंबिवली