गोठ्याला भीषण आग लागून 35 बकऱ्या आणि शेती साहित्य जळून खाक

गोठ्याला भीषण आग लागून 35 बकऱ्या आणि शेती साहित्य जळून खाक

पांढरकवडा तालुक्यातील तातापूर येथे एका शेतातील गोठ्याला आग लागून 35 बकऱ्या आणि शेती साहित्ये जाळून खाक झाले आहेत. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला.

  • Share this:

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 7 जून- पांढरकवडा तालुक्यातील तातापूर येथे एका शेतातील गोठ्याला आग लागून 35 बकऱ्या आणि शेती साहित्य जाळून खाक झाले आहेत. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला. भिकन बापूराव सोमनकार यांचे तातापूर येथील शेतातील गोठ्याला आग लागून 35 बकऱ्यासह शेती उपयोगी साहित्य जलून खाक झाले. त्यात भिकन बापूराव सोमनकार यांचे सुमारे 3 लाखांचे नुकसान झाले आहे.

तातापूर शिवारातील भिकन बापूराव सोमनकार यांच्या शेताला लागून असलेल्या शेतात काडी कचरा पेटविण्यात आला आहे. आगीच्या ठिणग्या सोमनकार यांच्या शेतातील गोठ्यावर उडाल्या. त्यात गोठ्यातील 35 बकऱ्या आणि शेतीचे साहित्ये जाळून खाक झाले. गोठ्याला आग लागल्याची माहिती मिळताच पांढरकवडा नगर परिषदचे अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत संपूर्ण गोठा आगीच्या विळख्यात आला होता. एकंदरीत भिकन सोमनकार यांचे जवळपास 3-4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

जळत्या चितेची ठिणगी उडून शेतात भीषण आग, मोसंबीच्या कलमा जळून खाक

स्मशानभूमीतील जळत्या चितेची ठिणगी उडून शेतात भीषण आग लागून मोसंबीच्या कलमा जळून खाक झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.  अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेवरून 14 किलोमीटर अंतरावरील शेंदुरजना (खुर्द) येथे ही घटना घडली होती.

शेतकरी प्रभुराज अमृतराव इंगळे यांचे सर्वे नं. 30 मध्ये साडेपाच एकर शेत आहे. यापैकी 2 एकरात त्यांनी मोसंबीच्या कलमा लावल्या होत्या. सदर शेत हे गावालगतच्या हिंदु स्मशानभूमीला लागून आहे. अशातच रविवारी गावात एका व्यक्तीचे निधन झाले. सदर व्यक्तीच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशातच सायंकाळी 5 च्या सुमारास चितेची ठिणगी अचानक उडाल्याने स्मशानभूमी परिसरातील वाळलेले गवत जळाले. आग पसरत जाऊन प्रभुराज इंगळे यांच्या शेतात पोहोचली. इंगळे यांचे 25-30 मोसंबीच्या कलमा जळून खाक झाल्या. इंगळे यांनी या कलमा 3 वर्षांपूर्वी लावल्या होत्या. धुऱ्यावरील निंबु, करवंदाची झाडे सुद्धा जळून खाक झाली होती.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

First published: June 7, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading