प्रेम प्रकरणातून 32 वर्षीय तरुणाची हत्या, संतप्त जमावाने जाळले आरोपीचे घर

आर्णी इथं प्रेम प्रकरणातून एका 32 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अकिल खान असे मृत तरुणाचे नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 05:07 PM IST

प्रेम प्रकरणातून 32 वर्षीय तरुणाची हत्या, संतप्त जमावाने जाळले आरोपीचे घर

भास्कर मेहरे (प्रतिनिधी)

यवतमाळ, 3 जून- आर्णी इथं प्रेम प्रकरणातून एका 32 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अकिल खान असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्णीच्या ड्रीम लँड सिटी परिसरातील ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळले आहे. यामुळे परिसरात तणाव पसरला आहे.

मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातील ड्रिल लँड परिसरात ही हत्या झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनाच्या गुन्हण्याची नोंद केली. अकिलचे परिसरतील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब तरुणीच्या नातेवाईकांना समजली. त्यावरून रविवारी रात्रीच्या सुमारास अकिल याला तरुणच्या घरासमोर बोलावण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी मंदा रामटेके, सतीश जमदाळे आणि नितीन कदम यांनी अकिलसोबत वाद घातला. अकिलने ही बाब त्याच्या मित्रांना सांगितली.

त्यांना घटनास्थळावर बोलावून घेतले. तोपर्यंत अकिल आणि आरोपी यांचात वाद सुरूच होता. अखिलच्या मित्रांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. आरोपीपैकी एकाने अकिलवर चाकूने वार केले. यात अकिल जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी दवाखान्यात हलवले. डॉक्टरांनी अखिलला मृत घोषित केले.

हे वृत्त शहरात वाऱ्या सारखे पसरले. संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी

Loading...

दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान,

आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

VIDEO:विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...