गंभीर! कडक उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूने उपराजधानी हादरली, 32 रुग्णांचा मृत्यू

गंभीर! कडक उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूने उपराजधानी हादरली, 32 रुग्णांचा मृत्यू

अवघ्या 7 दिवसांत स्वाईन फ्लूच्या बाधेनं तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळं उपराजधानी हादरली आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 26 एप्रिल : नागपूर शहरात तापमान 44 अंशापर्यंत पोहचल्यावरही स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराचा प्रकोप सुरूच आहे. शहरात अवघ्या 7 दिवसांत स्वाईन फ्लूच्या बाधेनं तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळं उपराजधानी हादरली आहे. यामुळे संपूर्ण नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यात नागपूरकरांचं आरोग्य रामभरोसे आहे असं म्हणायला हरकत नाही.

आतापर्यंत नागपूर विभागात 328 रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केवळ कमी तापमानात जीवंत राहणाऱ्या स्वाईन फ्लूच्या विषाणूंनी 43 डिग्रीच्या तापमानातही जीवंत राहण्याची क्षमता निर्माण केली आहे. त्यामुळं नागपूरचं तापमान 43 अंशावर गेलं असतानाही स्वाईन फ्लू संपलेला नाही.

काही वर्षात स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजारानं सर्वांच्याच मनात भीती निर्माण केली. या आजाराची अनेकांना लागण झाली आहे. तर काहींचा या आजारानं जीवही गेला. पावसाळा आणि हिवाळ्यात या आजाराची सर्वाधिक लागण होते. उन्हाळा आला की या आजाराचे विषाणू नष्ट होतात. 40 अंश सेल्सीअस तापमानात हे विषाणू जीवंत राहत नाही. मात्र, यंदा तापमान 43 अंशावर गेलं असतानाही हा आजार संपलेला नाही.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांवर पत्नीच्या छळवणुकीचा आरोप; पत्नीने विचारलं 'ये कब हुवा?'

नागपूर विभागात 1 जानेवारी पासून आतापर्यंत 328 रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून 32 रूग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळं या विषाणूंनी स्वत:ला वातावरणाशी जुळवून घेतल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळंच एवढ्या उन्हातंही हे विषाणू तग धरून असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

नागरिकांसाठी ही धोक्‍याची घंटा आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य विभागानंही जनजागृती करून या आजारापासून नागरिकांनी कसा बचाव केला पाहिजे, ही माहिती देण्याची गरज आहे. तसंच या आजाराचं समूळ उच्चाटन कसं करता येईल, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणं महत्त्वाचं असल्याची माहिती नागपूर विभागातील डॉ. संजीव जयस्वाल यांनी दिली.

VIDEO : सुजयच्या जागेबद्दल खरगेंचा मोठा खुलासा

First published: April 26, 2019, 6:00 PM IST

ताज्या बातम्या