Home /News /maharashtra /

बीडमधील बँकेत 316 कोटींचा गैरव्यवहार, संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बीडमधील बँकेत 316 कोटींचा गैरव्यवहार, संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश


बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती

बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती

बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती

बीड, 18 डिसेंबर :  आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे बीड  (beed) येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक ( Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank ) अडचणीत सापडली आहे. अखेर या प्रकरणी बँकेच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेसह न्यायालयाने दिले आहेत. सहकार आयुक्तांच्या आदेशावरून द्वारकादास मंत्री बँकेचे प्रशासक अशोक कदम हे बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसात ठाण मांडून बसले आहे. मात्र या प्रकरणात बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेत 316 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची ओरड झाल्यानंतर बीडमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रिझर्व्ह बँकेने द्वारका मंत्री बँकेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सदरचं प्रकरण एका तक्रारदारामार्फत गेलं. बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार झाल्याची तक्रार बळवंत चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात केली होती. त्यावर न्यायालयाने सहकार आयुक्तांवर ताशेरे ओढले. Pro Kabaddi : भारताच्या कबड्डीपटूंचा पगार पाकिस्तानच्या बाबर आझमपेक्षाही जास्त! न्यायालयाने सहकार आयुक्तांसह पोलीस प्रशासनावर कडक ताशेरे ओढत गुन्हे का दाखल केले जात नाहीत? असा सवाल केला. त्यानंतर आज द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक असलेले अशोक कदम व चाळक शिवाजीनगर पोलिसात मंत्री बँकेच्या संचालक मंडळासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. Sara Ali Khan ला आई अमृता सिंहनं दाखवला आरसा; अभिनेत्रीनं स्वतः केला खुलासा दरम्यान, सकाळी 11 वाजेपासून प्रशासक अशोक कदम पोलीस स्टेशनमध्ये बसले आहेत. मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे असं याचिकाकर्ते आणि तक्रारदार बळवंत चव्हाण यांनी सांगितलं. द्वारकादास बँकेविरोधात झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या