Home /News /maharashtra /

सांगा कसं जगायचं? कांद्याला फक्त 8 रुपये भाव, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

सांगा कसं जगायचं? कांद्याला फक्त 8 रुपये भाव, शेतकऱ्याने संपवले आयुष्य

 सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत

सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत

सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत

देवळा, 02 मे : राज्यात सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचे पडसाद भाजीपाल्यांवरही पडले आहे. एकीकडे लिंबाला विक्रमी भाव आला आहे तर कांद्याने (onion price) मात्र शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील देवळा इथं एका शेतकऱ्याने आत्महत्या (farmer commits suicide) केली. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने विष घेऊन जीवन संपवल्याची मनहेलावून टाकणारी घटना देवळा तालुक्यातील खुंटेवाडी इथं घडली आहे. महेंद्र भामरे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांद उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र भामरे या तरुण शेतकऱ्याने कांद्याचे पिक घेतले होते. मात्र, बाजारात कांदा विक्रीसाठी गेले असता योग्य भाव मिळाला नाही. (होणाऱ्या जावयाने मेव्हणीला नेलं पळवून, मुलीच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय) महेंद्र भामरे या शेतकऱ्याने आज बाजार समितीत कांदा विकला त्याला प्रति क्विंटल 800 रुपये 8 रुपये किलो इतकाच भाव मिळाला. 30 क्विटल कांद्याचे अवघे 24 हजार रुपये हाती येणार होते. एवढ्या खर्चात  वाहतुकीचा खर्च देखील निघत नसल्याचे पाहून महेंद्र भामरे हैराण झाले होते. यातून या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. महेंद्र भामरे यांनी घरी आल्यावर विष घेऊन आपली जीवन यात्रा संपली. या घटनेमुळे देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे 5 गायी अन् 20 कोंबड्यासह घराची झाली राखरांगोळी दरम्यान, कासोदा ते एरंडोल महामार्ग  रस्त्यावरील आडगाव गावाला लागून असलेल्या प्लॉट एरियात भीषण आग लागली. या ठिकाणी सांबा धना बारेला हे कुटुंबासोबत राहत होते. दुपारी त्यांच्या घरात अचानक आग लागली असता घरात लहान दोन मुली, एक मुलगा ,नातू असा परिवार होता. (घरी बोलावून प्रेयसीचा गळा दाबून केला खून, मृतदेह फेकला नाल्यात) आग लाग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता त्या मुलांना त्यांचे घरातून बाहेर काढले. या आगीत पाच गायी, दोन बोकड, वीस ते तीस कोंबडी जळून खाक झाले. तसंच घरातील अन्नधान्य कपडे, शिलाई मशीन, टीव्ही ,मोटरसायकल असे हजारो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. या दुर्देवी घटनमुळे कुटुंबीय उघड्यावर येऊन गेले असून आगीत संपुर्ण संसार  उद्ध्वस्त झाला. ही आग  विजवण्यासाठी एरंडोल नगरपालिका व भडगाव नगरपालिका यांचे अग्निशामक बंब मागविण्यात आले व साधारणता दीड ते दोन तासांच्या परिश्रमाने आग विझवण्यात आली.

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या