मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भुसावळमध्ये भाजपला मोठे भगदाड, तब्बल 30 नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळमध्ये भाजपला मोठे भगदाड, तब्बल 30 नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे.

राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे.

राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे.

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 17 डिसेंबर : विधान परिषदेच्या निवडणुकीत सहा पैकी 4 जागा जिंकून भाजपने महाविकास आघाडीला (mva government) धक्का दिला. पण, आता राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे.  भुसावळमध्ये भाजप नगराध्यक्षांसह 30 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भाजपला हा मोठा हादरा माणला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.  भुसावळच्या भाजप नगराध्यक्षांसह 22 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.

..तर तुम्हीही MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, कशी करावी तयारी?

एवढंच नाहीतर सावदा नगरपरिषदेच्या भाजप नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह 8 नगरसेवक सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी या नगरसेवकांसह अनेक पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत झालेल्या मेगाभरतीमुळे चैतन्याचं वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपला मोठी गळती लागली आहे. जळगावमध्ये महिना-दोन महिन्यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. जळगावच नाहीतर राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे नगरसेवक आणि नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.

नांदगावात सुद्धा राष्ट्रवादीचा भाजपला धक्का

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवल्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. पवार यांनी त्यांच्या समर्थकांसोबत मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले आहे. यावेळी मालेगाव तालुक्यातील देखील काही भाजपच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ,जिल्हा अध्यक्ष रविंद पगारसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Girish mahajan, एकनाथ खडसे