Home /News /maharashtra /

मन हेलावून टाकणारी घटना, खेळता खेळता 3 वर्षांची चिमुरडी पडली 30 फूट खोल खड्ड्यात!

मन हेलावून टाकणारी घटना, खेळता खेळता 3 वर्षांची चिमुरडी पडली 30 फूट खोल खड्ड्यात!

झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय 3) व रेहान इम्रान शेख (वय 5) ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली.

भिवंडी, 01 जानेवारी : भिवंडीमध्ये (Bhiwandi) मलनिस्सारण केंद्राच्या खड्ड्यात पडून एका 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या दुर्घटनेतून एका 5 वर्षांच्या चिमुरड्याला वाचवण्यात यश आले आहे. चिमुरडीच्या मृत्यूमुळे शहरात संतापाची भावना उमटली आहे. भिवंडी शहरात मलनिस्सारण प्रकल्प राबविला जात असून या मध्ये ठेकेदार ईगल इन्फ्रास्ट्रक्चरया कंपनीकडून भुयारी गटर व ठिकठिकाणी उदच्चन केंद्र बनविली जात आहेत. शहरातील चव्हाण कॉलनी कोंडाजी वाडी या भागात उदच्चन केंद्र बनविण्यात येत असून तेथे सुमारे 30 फूट खड्डा खोदण्यात आला आहे. कोरोना काळात काम बंद असल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून डबके झाले आहे. थर्टी फस्टच्या पार्टीला गेला अन् परत आलाच नाही, तरुणाच्या मृत्यूमुळे खळबळ शुक्रवारी नजीकच्या झोपडपट्टीतील गौसिया आरिफ शेख (वय 3) व रेहान इम्रान शेख (वय 5) ही दोन चिमुरडी मुले त्या ठिकाणी खेळत असताना त्यांचा तोल जाऊन ती पाण्यात बुडाली. नजीकच्या इमारतीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरीकांनी पाण्यात उड्या मारून या दोन्ही मुलांना बाहेर काढून नजीकच्या आयजीएम रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी गौसिया आरिफ शेख ही 3  वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तर रेहान इम्रान शेख हा वाचला असून त्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात राजकारणात ओवैसींची मोठी खेळी; काँग्रेसची झोप उडाली, पण भाजपचं काय? या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यासाठी शांतीनगर पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय येथील परिस्थिती आटोक्यात आणली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून येथे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असताना ते न ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याने कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा स्थानिक नगरसेवक अरुण राऊत यांनी दिला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या