आधी बारमध्ये बोलावलं नंतर पाठलाग करून सपासप वार करून संपवलं, अंगावर शहारे आणणारा हत्येचा VIDEO

आधी बारमध्ये बोलावलं नंतर पाठलाग करून सपासप वार करून संपवलं, अंगावर शहारे आणणारा हत्येचा VIDEO

उल्हासनगर झोन ४ चारमध्ये वर्षभरात १७ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यात उल्हासनगर पोलीस पूर्णपणे अपयशी ठरेल आहेत.

  • Share this:

उल्हासनगर, 21 जानेवारी : उल्हासनगरमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळीने एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दीपक भोईर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

उल्हासनगरच्या नेहरू चौक परिसरात माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या तरुणांची पाच ते सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली. हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अंगावर शहरे आणणारा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या त्याच्याच ओळखीच्या नरेश उर्फ बबल्याने केल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक भोईरचा खून करण्यासाठी त्याच्याच मित्रांनी सापळा रचला होता. शहरातील दुर्गा बारमध्ये दीपकला एका मुलीनं फोन करून बोलावलं होतं. दीपक बारमध्ये पोहोचला आणि संबंधित मुलीची भेट घेतली. त्यानंतर बारमधून बाहेर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या नरेश उर्फ बबल्या आणि त्याच्या मित्रांनी दीपकवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी दीपकने पळ काढला. हल्लेखोरांनी चाकू-तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला. काही अंतर दूर गेल्यानंतर दीपक खाली कोसळला. पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी दीपकवर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा जागीत मृत्यू झाला. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान, या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अटक होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी  घेतलाय.

उल्हासनगरमध्ये वर्षभरात १७ हत्या

उल्हासनगर झोन ४ चारमध्ये वर्षभरात १७ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यात उल्हासनगर पोलीस पूर्णपणे अपयशी ठरेल आहेत. हे अधोरेखित होतंय. व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर ओळख आता पुन्हा गुन्हेगारी शहर म्हणून होत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि  व्यापारी या शहरात प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2020 07:14 PM IST

ताज्या बातम्या